मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात: डोनाल्ड ट्रम्प बरळले वाचा सविस्तर काय आहे प्रकरण

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी या दोघांनाही काही दिवसापूर्वी कोरणा ची लागण झाली होती. सुदैवाने हे दोघेही या रोगा मधून बाहेर पडले. आज गेले कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जगाला कोरोना ने वैतागून सोडले आहे. भारत देशामध्ये कित्येक महिने संपूर्णपणे लॉकडाउन होते.
कितीतरी दिवस जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व बाजारपेठा व दुकाने बंद होती. भारतासह संपूर्ण जगाला कोरोणा मुळे आर्थिक संकटात टाकले आहे. संपूर्ण जग हे कोरोनाच्या लसीची वाट पाहत आहे.

खबरदारी म्हणून संपूर्ण जगामध्ये मास्कचा वापर केला जातोय. मास्क मुळे कोरोना पासून बचाव होत असल्याचे बऱ्याच आरोग्य संस्थांनी मान्य केले आहे.

26 सप्टेंबरला वाईट हाऊस मध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना ची लागण झाली होती असे बोलले जात आहे. कारण या कार्यक्रमादरम्यान उपस्थित बऱ्याच लोकांनी मास्क घातले नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी एक अजब उत्तर दिले आहे ते म्हणाले मास्क घातलेले लोक कोरोनाग्रस्त असतात. त्यांच्या वक्तव्याला कोणत्याही वैज्ञानिक संस्थेने पुष्टी दिलेली नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.