रेशन दुकानाच्या वादावरून भाजप कार्यकर्त्याने केली गोळ्या झाडून हत्या.

0

रेशन दुकानासंबंधी बैठक सुरू असताना झालेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली.

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ही बैठक रेशन दुकानाच्या वाटपासाठी बोलवण्यात आली होती. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सदस्यांमध्ये वाद झाल्याने ही बैठक अधिकाऱ्याने रद्द केली. या दरम्यान भाजप कार्यकर्ता धीरेन्‍द्र सिंह याने जयप्रकाश यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे ही बैठक प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होती. तरीसुद्धा ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरोपी धीरेन्‍द्र सिंह हा रोहानीया या मतदार संघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्ती आहे. आरोपी धीरेन्‍द्र सिंह भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आमदार सुरेन्द्र सिंह यांनी मान्य केले आहे.

या घटनेसंबंधी बोलताना आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक वादग्रस्त विधान देखील केले आहे. तुम्ही ज्याला आरोपी म्हणत आहात, त्याच्या वडिलांना सुरुवातीला त्याने काठीने मारलं. जर एखाद्याच्या परिवारावर कोणी हल्ला केला तर समोरचा क्रियेची प्रतिक्रिया देणारच. असं वादग्रस्त विधान आमदार सुरेन्द्र सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं.

सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आपले विधान बदललं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं आहे,ते माहीत नाही. दोन्हीकडील लोकांकडून दगडफेक सुरू झाली. यामध्ये कोणी फायरिंग केली,हे समजू शकले नाही. अशा घटना कुठेही घडू शकतात. घटनेची योग्य चौकशी करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. असं आमदार सुरेंद्र सिंग यांनी शेवटी सांगितले.

या घटनेची योग्य ती चौकशी करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. असे सांगण्यात आले असले तरी,अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. असे गृह खात्याकडून सांगण्यात आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.