Raha pics: रणबीर आणि विराट कोहलीची लेक म्हणजे कार्बन कॉपी; पाहा दोन्ही फोटो..
Raha pics: भारतामध्ये क्रिकेट आणि बॉलीवूडची (cricket and bollywood) मोठी क्रेझ आहे. बॉलीवूड आणि अनेक दिग्गज क्रिकेटच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. अगदी आपल्या आवडत्या स्टार्स कलाकार आणि खेळाडूंना चाहते फॉलो देखील करण्याचा प्रयत्न करतात. आवडत्या स्टार्सची मुलं कशी दिसतात? काय करतात, हेही पाहण्यात अनेकांना कुतूहल असतं.
आलिया आणि रणवीर यांची मुलगी राहाला Alia Bhatt and Ranbir Kapoor daughter Raha) रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकतंच कॅमेरा पुढे आणलं आहे. रणबिर कपूर आणि आलिया भट्टच्या मुलीच्या सौंदर्याचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे. या दोघांची मुलगी प्रचंड सुंदर असून, अनेकजण राहाच्या डोळ्याच्या प्रेमातही पडले आहेत. रणबीर कपूरची मुलगी राहाच्या डोळ्याची तुलना राज कपूर यांच्या डोळ्याशी केली जात आहे. अगदी राहाचे डोळे हुबेहूब राज कपूर यांच्या डोळ्यासारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. केवळ राज कपूर यांच्याशीच नाही, तर रणबीर कपूरची मुलगी राहाची (raha) तुलना विराट कोहलीची (Virat kohli) मुलगी वामिकाशी देखील केली जात आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने देखील सुंदर आणि गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या दोघांच्या मुलीचं नाव वामिका असून, वामिका हिचे देखील डोळे हुबेहूब रणबीरची मुलगी राहाच्या डोळ्यासारखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीची मुलगी वमिका आणि आणि रणबीर कपूरची मुलगी राहा एकत्र करून फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये दोघींना एकमेकांची कार्बन कॉपी असल्याचे म्हटलं गेलं आहे.
रणबीर आणि अनुष्का शर्मा हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी आपल्या मैत्रीचे किस्से उघडपणे अनेकदा सांगितले आहेत. अनुष्का शर्माने अनेक वर्ष विराट कोहलीला डेट केल्यानंतर, 2017 मध्ये त्याच्याशी लग्न केले. 2021 मध्ये विराट आणि अनुष्का शर्माला मुलगी झाली.
रणबीर कपूरने देखील आलिया भट्टशी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विवाह केला. विशेष म्हणजे आलिया भट लग्न अगोदरच प्रेग्नेंट होती. लग्नानंतर साडे पाच महिन्यांनी आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर विराट कोहली आणि रणबीर कपूर या दोघांच्याही मुलींचे फोटो पोस्ट केले जात आहेत.
हे देखील वाचा IND vs SA 1St test live: सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; असा असेल संघ पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम