Chanakya niti on wife: चाणक्य का सांगतात सुंदर बायको नको म्हणून..? कारण वाचून तुम्हीही चक्रावून जाल..
Chanakya niti on wife: लग्न (marriage) हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आज ना उद्या प्रत्येकाला लग्न करावंच लागतं. प्रत्येकाच्या लग्नासंदर्भातल्या कल्पना वेगवेगळ्या असल्या तरी लग्न या प्रक्रियेतून मात्र सगळ्यांनाच जावं लागतं. कुठलंही नातं विश्वास, समजूतदारपणा, आणि सन्मान या गोष्टींवर टिकून असते. मात्र सगळ्यांनाच या गोष्टीची जाणीव असते, असं नाही.
अलीकडच्या काळात लग्न झाल्यानंतर, काही महिन्यातच वाद-विवाद व्हायला सुरुवात होते. अगदी वादविवाद इतके टोकाला जातात, की काही महिन्यातच पती-पत्नी वेगळे देखील होण्याचा निर्णय घेतात. आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी नातेसंबंध आणि लग्नाविषयी आपल्या चाणक्य नीति (chanakya niti) या ग्रंथांमध्ये सविस्तरपणे लिहून ठेवलं आहे. आचार्य चाणक्य यांनी विवाहासाठी योग्य जोडीदार कसा असावा? याविषयी देखील भाष्य केलं आहे. चाणक्य सांगतात, सौंदर्य माणसाच्या कायम सोबत राहत नाही. कायम एकमेकांची सोबत हवी असेल, तर तुम्हाला सौंदर्यापेक्षा बौद्धिक क्षमतेचा विचार करावा लागेल.
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दोघांमध्येही बौद्धिक क्षमता फार आवश्यक आहे. अनेकजण केवळ सौंदर्य पाहून विवाह करण्याचा निर्णय घेतात. मात्र ही सर्वात मोठी चूक ठरते. सौंदर्य हे काही काळ टाकत असते. मात्र बौद्धिक क्षमता आयुष्यभर तुमची साथ देत असते. पती पत्नी दोघांनाही एकमेकांची साथ हवी असेल, तर बौद्धिक क्षमतेचा विचार करून विवाह करण्याचा निर्णय घ्यायला हवा, असं चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य सांगतात, केवळ सौंदर्य पाहून विवाह करण्याचा निर्णय घेणारे मनुष्य बरबाद होण्याची शक्यता अधिक असते. आचार्य चाणक्य सांगतात, केवळ सौंदर्य हे विवाहासाठी पुरेसं नाही. विवाह टिकण्यासाठी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांना आपलं समजणं आणि त्यानुसार आपलं वर्तन करणे, या गोष्टी खूप आवश्यक असतात. असं चाणक्य सांगतात.
त्यामुळे सौंदर्याबरोबर महिला समजूतदार आहेत की नाही, हे पाहणं अधिक आवश्यक आहे. चाणक्य सांगतात, महिला धार्मिक असायला हवी. थोरामोठ्यांसोबत संवाद साधताना तिच्यामध्ये नम्रता असणे आवश्यक आहे. जर ती धार्मिक असेल, तर या गोष्टी तिच्यामध्ये उपजत असतात. त्यामुळे केवळ सौंदर्य पाहून लग्न करण्याचा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही महिलेच्या बौद्धिक क्षमतेचाही विचार करूनच निर्णय घ्यायला हवा असं चाणक्य सांगतात.
हे देखील वाचा IND vs SA 1St test live: सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; असा असेल संघ पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम