IND vs AUS 1St T20: Disney+ hotstar वर नाही दिसणार भारत ऑस्ट्रेलिया T20 सिरीज..

0

IND vs AUS 1St T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर, ही पहिली मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आल्याने, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका पार पडणार आहे.

 

आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र असं असलं तरी ऑस्ट्रेलिया संघाने देखील आपला पूर्ण क्षमतेचा संघ मैदानात उतरवलेला नाही. टी-ट्वेंटी विश्वचषक संघात आपलं स्थान बळकट करण्याची प्रत्येक खेळाडूकडे संधी असणार आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, या खेळाडूंकडे विशेष लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T 20 मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंचा सहभाग नसल्याने मालिका फारशी चर्चेत नाही. मात्र तरी देखील टी-20 क्रिकेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात असल्याने, क्रिकेट चाहत्यांना टी ट्वेंटी मालिकेची उत्सुकता आहे. पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना उद्या विशाखापट्टणम येथे संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे

विशाखापट्टणम या मैदानावर उद्या सात वाजल्यापासून क्रिकेट चाहत्यांना सामना पाहता येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण Disney+ hotstar आणि स्टार स्पोर्ट वाहिनीवर केले जाणार नाही. या संपूर्ण मालिकेचे प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना सोनी नेटवर्क आणि JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सोनी नेटवर्क आणि JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना मोफत पाहता येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र jio युजर्सकडून दर आकारणार आहे.

T 20 सामन्यांच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला टी ट्वेंटी सामना; 23 नोव्हेंबर विशाखापट्टणम

दुसरा टी ट्वेंटी सामना; 26 नोव्हेंबर तिरुअनंतपुरम

तिसरा ट्वेंटी सामना; 28 नोव्हेंबर गुवाहाटी

चौथा ट्वेंटी सामना; 1 डिसेंबर रायपूर

पाचवा ट्वेंटी सामना; 3 डिसेंबर बंगलोर

हे देखील वाचा Narendra Modi meet Indian cricket team: पराभवानंतर ड्रेसिंग रूम मधील तो व्हिडिओ व्हायरल; रोहितचा किशातून हात काढत नरेंद्र मोदी म्हणाले..

IND vs AUS T20 series: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेसाठी धक्कादायक संघाची निवड; या चार खेळाडूंना डच्चू दिल्याने नाव वाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.