हवाई दलातील विमानांचा अपघात;15 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानांचा अपघात झाल्याची घटना काल रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये घडलेल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. या अपघातामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन हवाई दलांच्या विमानांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.
दोन्ही जवानांना,हवाई दलाच्या विमानांमधून ऑपरेशनसाठी एकाच ठिकाणी उतरायचे होते. परंतु ही दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली आणि हा मोठा अपघात घडल्याची माहिती टोलो न्यूजने दिली आहे. अपघात घडल्यानंतर आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वीही 24 सप्टेंबरला अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या विमानाचा अपघात होऊन दोन पायलटांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम