WC Semi final: अजूनही रंगू शकतो भारत-पाकिस्तान सेमी फायनलचा थरार; पण त्यासाठी पाकिस्तानला करावं लागेल हे कठीण काम..
WC Semi final: विश्वचषक 2023 चे तीन सेमी फायनालिस्ट (World Cup 2023 semi-final) मिळाले आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ अधिकृतरित्या सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. चौथा सेमी फायनालिस्ट म्हणून पाकिस्तान संघाला देखील संधी आहे. मात्र इंग्लंड विरुद्धचा सामना पाकिस्तान संघाला खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. काल श्रीलंके विरुद्ध न्यूझीलंडने मोठा विजय साकारल्यामुळे पाकिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. India (South Africa Australia New Zealand semi finalist 2023)
भारत आणि पाकिस्तान या दोन संघाच्या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असतं. अगदी ब्रॉडकास्टर्स देखील या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलचा सामना होण्याची शक्यता देखील आहे. जाणून घेऊया, पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे.
न्युझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघापैकी न्युझीलंड संघाने आपले सेमी फायनलचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. असं असलं तरी पाकिस्तान संघाला देखील सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंड विरुद्ध 287 धावांनी विजय साकारावा लागणार आहे.
पाकिस्तान संघाने इंग्लंड विरुद्ध 287 धावांनी विजय साकारला, तरच न्युझीलंड पेक्षा पाकिस्तान संघाचे रन रेट अधिक होईल. आणि पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. या विश्वचषकातला चौथा संघ म्हणून पाकिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे भारत पाकिस्तान असा सेमी फायनल सामना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळेल. मात्र याची शक्यता फार कमी वाटते.
जर इंग्लड संघाने प्रथम फलंदाजी केली, तर मात्र पाकिस्तान संघाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता संपुष्टात येणार आहेत. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केली, तर इंग्लंड संघ जे काही आव्हान देईल, ते आव्हान पाकिस्तान संघाला केवळ 16 चेंडूत पूर्ण करायचे आहे. जे जवळ जवळ अशक्य आहे.
याचाच अर्थ पाकिस्तान संघ या स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर गेला असल्याची घोषणा झाली नाही. मात्र त्यांचे या वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड सामन्यानंतर न्युझीलंड संघापुढे अधिकृतरित्या सेमी फायनल क्वालिफाय लावलं जाईल. आणि पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना न्युझीलंड आणि भारत या दोघांमध्ये सेमी फायनल सामना पाहायला मिळेल.
हे देखील वाचा World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमीvफायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..
Avoid These Food In Dinner: सावधान..! रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका हे आठ शाकाहारी पदार्थ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम