World Cup semi final scenario | 15 तारखेला वानखेडेवर भारताचा या तगड्या संघासोबत रंगणार सेमीफायनल..
World Cup semi final scenario | विश्वचषक 2023 मध्ये (world Cup 2023) भारतीय संघटना फॉर्म मध्ये आहे. या विश्वचषकातला भारत एकमेव संघ आहे, जो आतापर्यंत अपराजित राहिला आहे. सात सामन्यात सात विजयासह भारत अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये आता अव्वल क्रमांकावर कायम राहणार असल्याने, सेमी फायनलचे गणितही स्पष्ट झाले आहे. (World Cup semi final scenario)
वर्ल्ड कप 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक संघाचे सात आणि त्या पेक्षा जास्त सामने पूर्ण झाले आहेत. पाकिस्तान आणि न्युझीलंड संघाचे आज आठ सामने पूर्ण होत आहेत. पाकिस्तान आज अधिकृतरित्या या स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याची शक्यता आहे. न्युझीलंड संघाने पाकिस्तान समोर 402 धावांचे आव्हान उभे केलं आहे. पाकिस्तान संघाची सुरुवातही निराशा जनक झाली आहे. त्यामुळे विजयासह आज न्यूझीलंड या स्पर्धेतील चौथा किंवा तिसरा संघ म्हणून आपलं नाव निश्चित करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत सात विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका सात सामन्यात सहा विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे देखील सेमी फायनल मधील स्थान निश्चित मानले जात आहे. उर्वरित दोन्ही सामने दक्षिण आफ्रिका पराभूत झाली तरी देखील ते सेमी फायनल मधील पोहचणार आहेत. मात्र दोन्ही सामने पराभव झाल्यामुळे आफ्रिका तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले जाऊ शकतात.
दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित दोन सामने भारत आणि अफगाणिस्तान संघासोबत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पराभूत होण्याची शक्यता फार कमी आहे. भारतानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या चार संघांमध्ये सेमी फायनलच्या लढती होणार हे अधिकृतरित्या स्पष्ट झाले नसले तरी यात काही उलट फेर होईल, याची शक्यता फार कमी आहे. सेमी फायनलच्या या चार संघांमध्ये कोण कोणासोबत खेळणार? हे गणित देखील जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर कायम राहील. दक्षिण आफ्रिका देखील दुसऱ्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी चढाओढ असेल. विश्वचषक 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (wankhede stadium Mumbai) खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील अव्वल आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दोन संघामध्ये होणार आहे.
गुणतालिका पाहिल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या आणि न्यूझीलंड संघ चौथ्या क्रमांकावर आहे. न्युझीलंड पेक्षा ऑस्ट्रेलिया संघ एक सामना कमी खेळला आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासह ऑस्ट्रेलिया संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल हेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर न्युझीलँड संघ असेल. गुणतालिके मधील पहिला आणि चौथा संघ म्हणजेच, भारत आणि न्यूझीलंड मुंबईमध्ये वानखेडे मैदानावर 15 तारखेला पहिला सेमीफायनल सामना खेळतील.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम