Hardik Pandya ruled out: Semi final पूर्वी टीम इंडिया संकटात; Hardik Pandya वर्ल्ड कपमधून बाहेर! या तगड्या खेळाडूची संघात एंट्री..

0

Hardik Pandya ruled out: भारत विश्वचषक 2023 च्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सात सामन्यात सात विजयासह गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतच पहिला सेमी फायनल खेळण्याची दाट शक्यता आहे. मात्र सेमी फायनलपूर्वीच भारतीय संघ संकटात सापडला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आता विश्वचषक 2023 मधून आऊट झाला आहे. (Hardik Pandya ruled out of World Cup 2023)

सेमीफायनल पूर्वीच हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) रूपात भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. हार्दिक पांड्याच्या बाहेर होण्याने संघातील प्लेइंग 11 चे गणित पुन्हा बिघडले आहे. हार्दिक पांड्या हा जलदगती गोलंदाज आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने, संघातील त्याचे महत्त्व प्रचंड आहे. हार्दिक पांड्याच्या बाहेर होण्याने आता भारतीय संघाला चार स्पेशालिस्ट गोलंदाज आणि पाच स्पेशालिस्ट फलंदाजासह रवींद्र जडेजाच्या रूपात एक ऑल राऊंडर घेऊन मैदानात उतरावे लागणार आहे.

बांगलादेश विरुद्ध खेळताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळून दुखापत झाली होती. त्याची दुखापत गंभीर असल्याने, हार्दिक पांड्या रिकव्हर होऊ शकला नाही. यापुढे हार्दिक पांड्या उर्वरित विश्वचषकात दिसणार नसून, त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची (prasiddh Krishna) निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघासोबत जोडला गेला असून, हा भारतीय संघासाठी मोठा धोका आहे.

हार्दिक पांड्याच्या बाहेर होण्याने आता एक अतिरिक्त फलंदाज आणि अतिरिक्त गोलंदाजाचा ऑप्शन कॅप्टन रोहित शर्मापुढे (Rohit Sharma) नसणार आहे. भारतीय संघाला केवळ पाचच गोलंदाज घेऊन आपली प्लेइंग इलेव्हन बनवावी लागणार आहे. महत्त्वाच्या सामन्यात जर एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाली, तर उर्वरित षटके कोण टाकणार? हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सेमी फायनलमध्ये पाच गोलंदाजांपैकी एक गोलंदाज जखमी झाला, तर त्याची उर्वरित शटके कोण पूर्ण करणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर असं झालं तर भारतीय संघाचे 2023 मधील आव्हान संपुष्टातही येऊ शकतं. त्यामुळे भारतीय सेमी फायनलमध्ये पाचच गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार का? हा मोठा प्रश्न आहे. हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे भारताच्या प्लेइंग11 मध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळणार असली तरी एक अतिरिक्त गोलंदाज आणि आठव्या क्रमांकावर एक अतिरिक्त फलंदाज मिळणार नाही.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, बुमरा, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या पाच गोलंदाजासह भारतीय संघाला मैदानात उतरावं लागणार आहे. हार्दिक पांड्या शिवाय खेळलेल्या तीनही सामन्यात भारताच्या पाच गोलंदाजांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं असलं तरी एखादा ऑफ डे किंवा खेळताना गोलंदाज जखमी झाला, तर भारतीय संघासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. भारताचा पुढचा सामना उद्या ईडन गार्डन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे.

हे देखील वाचा Ranveer Deepika News: रणवीर सोबत असताना दीपिका एकच वेळी करत होती त्या चौघांना डेट; नाव विचारल्यावर झाला बवाल, पाहा व्हिडिओ..

MS Dhoni On relationship: नात्याविषयी MS Dhoni ने दिला भन्नाट सल्ला; म्हणाला, सगळ्या मुली सारख्याच..; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.