14 महिन्यानंतर मेहबूबा मुक्ती झाल्या आझाद!

0

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामध्ये पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांचाही समावेश होता. आज त्यांना तब्बल चौदा महिन्यानंतर मुक्त करण्यात आलं आहे.

15 ऑगस्ट 2019 पासून मेहबूबा मुक्ती हृया नजर कैदेत होत्या. मेहबूबा मुक्ती यांची मुलगी इल्तिजा मुक्ती यांनी आपल्या आईच्या अटकेविरोधात सार्वजनिक सुरक्षा अधिनियम (पीएसए) अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेत बदल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना जम्मू-काश्मीर प्रशासनाला प्रश्न विचारला? सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत एखाद्याला जास्तीत जास्त किती दिवस कैद करून ठेवण्यात येतं? मेहबूबा मुक्ती यांना आणखी किती काळ कैदेत ठेवणार?

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, नजरकैद ही कायमची करता येत नाही. मेहबूबा मुक्ती यांना मंगळवारी नजर कैदेतून मुक्त करण्यात आलं. मेहबूब मुक्ती नजर कैदेतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ऑडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये त्यांनी ५ ऑगस्ट ह्या काळ्या दिवसाचा काळा फैसला माझ्या मनात आणि हृदयात सतत वार करत राहिला. मला जाणीव आहे जम्मू-काश्मीरमधील लोकांच्याही मनात हीच भावना राहीली आहे. पाच ऑगस्टला बेकायदा 370कलम हटवलं ते आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. असेही मेहबूबा मुक्ती आपल्या या ऑडिओमध्ये म्हणाल्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.