राज्यपालांना पडला घटनेचा विसर? भाजपचा शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न.

0


मत्रिपदाची शपथ देत असताना राज्यपालांनी मंत्र्यांना घटनेचा दाखला दिला होता. ” नाही नाही पुन्हा शपथ घ्या तुम्हाला जेवढे दिले आहे तेवढेच वाचा. कृपया समोर वरिष्ठ लोक आहेत. शरद पवार आहेत, खर्गेजी आहेत त्यांनी जर मला अडवले तर मी पुन्हा शपथ घ्या, असे म्हणणार नाही.” काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांना घटनेनुसार शपथ न घेतल्याने राज्यपालांनी टोकले होते. घटनेत जे प्रमाण दिले आहे, त्यालाच अधीन राहून शपथ घ्या असे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी म्हटले होते. मात्र आज याच भगतसिंह कोषारी घटनेचा विसर पडल्याचे दिसते आहे.

मंदिराच्या मुद्द्यावरून भगतसिंह कोषारी यांनी उद्धव ठाकरे यांना धर्मनिरपेक्ष झालात काय असा सवाल केला आहे. परंतु राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील या वादाचा परिणाम पुढील राजकीय वादावर होणार का? हाही सवाल आहे. कारण शिवसेनेने राज्यपालांच्या हस्तक्षेपावर बोट ठेवले आहे.


‌याबाबत संजय राऊत यांच्याशी संपर्क केला असता ते बोलले “मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राज्यपालाला , कोणतेही आकांडतांडव न करता, सुस्पष्ट आणि विनम्र भाषेमध्ये कसे उत्तर द्यावे, असा एक आदर्श असा एक परिपाक मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालीनतेने मांडला आहे. परंतु भाजपने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्यामैत्री कडे बोट दाखवले आहे.


‌ देवेंद्र फडणवीस म्हणतात “राज्यामध्ये मदिरालय चालू होतात मात्र मंदिर चालू होत नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. देशातल्या इतर राज्यांनी मंदिर सुरू केली. मंदिरे सुरू झाल्याने कुठेही कोरोना वाढल्याचे लक्षात येत नाही.”
‌चंद्रकात पाटील म्हणतात “उध्दव ठाकरे असे म्हणत आहेत की हिंदुत्वा बाबत आम्हाला शिकवू नये. परंतु तुम्हाला शिकवायला लागेल ना हिंदुत्व सोडून तुम्ही गादीवरती बसलात.”

‌आशिष शेलार म्हणतात “तुम्हाला हे नाकारता येणार नाही की, कसाबला ज्यांनी बिर्याणी खाऊ घातली. त्यांच्याशी संगनमत तुम्ही केले आहे आणि तुम्हाला हेही नाकारता येणार नाही ज्यावेळी तुम्ही पंढरपूरला गेलात, त्यावेळी तुम्ही आमच्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श देखील केला नाही आणि त्यामुळे तुमचं हिंदुत्व आता भेसळ झाले आहे. “

‌ प्रवीण दरेकर म्हणतात “आपण सत्तेच्या हव्यासापोटी, लालसेपोटी राष्ट्रवादीच्या दबावाखाली धर्मनिरपेक्ष भूमिका स्वीकारली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे.”

‌भाजपने सध्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आता पुढे काय घडते व पुढील राजकारणावर याचा काही परिणाम होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.