Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..
Saif Ali Khan: सैफ अली खानने (saif ali khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपलं नाव फारसे कमवलं नसलं तरी तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. नाईंटीनच्या दशकात अनेक तरुणींना सैफ अली खानने भुरळ पाडली होती. सैफ अली खान आपल्या रील लाइफ पेक्षा रियल लाईफमुळे अधिक चर्चेत असतो. नुकत्याच एका यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीत स्वतःविषयी मोठा खुलासा समोर आला आहे.
अमृता सिंग (amruta Singh) सोबत घटस्फोट झाल्यानंतर, सैफ अली खानने करीना कपूर (Kareena Kapoor) सोबत विवाह केला. अमृता सिंग पासून सैफ अली खानला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. तर करीना कपूर पासून देखील सैफ अली खानला दोन मुलं आहेत. “हम साथ साथ है” या चित्रपटात सैफ अली खानने केलेल्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) निर्मित हम साथ साथ है या चित्रपटातील एक किस्सा स्वतः सैफ अली खानने सांगितला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सलमान खान, तब्बू, करिश्मा कपूर सारखे मोठे स्टार या सिनेमात असल्याने सैफ अली खान घाबरला होता. या स्टार सोबत आपल्या देखील अभिनयाचं कौतुक व्हायला हवं. आणि म्हणून तो घाबरला होता.
यापूर्वी मी अनेकदा एका टेकमध्ये अनेक सीन शूट केले होते. मात्र “हम साथ साथ है” च्या सेटवर मला अनेकदा रिटेक घ्यावे लागले. सूरज बडजात्या यांना दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा झाला आहे. सुरज बडजात्या म्हणाले, सैफ अली खान छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घ्यायचा. हम साथ साथ है चित्रपटाचा सेटवर तो नेहमी डायलॉग वाचत बसलेला दिसायचा.
एकदा मी त्याची पत्नी अमृता सिंग हिला सैफ अली खान असा का करत आहे? याविषयी विचारलं. तेव्हा तिने मला सांगितले, सैफ अली खान रात्रभर झोपत नाही. तो स्वतःला नेहमी आरशात पाहत बसतो. झोप होत नसल्याने, तो सेटवर तणावात राहत असल्याचे अमृता म्हणाली होती. आदल्या दिवशी “सूनो जी दुल्हन” या गाण्याचं सूट होणार होतं. आणि म्हणून शांत झोप लागावी, सकाळी तो सेटवर फ्रेश यावा. यासाठी सुरज बडजात्याने अमृताला झोपेच्या दोन गोळ्या सैफ अली खानला द्यायला सांगितल्या होत्या.
अमृता सिंगने झोपेच्या दोन गोळ्या सैफ अली खानला दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी “सूनो जी दुल्हन” या गाण्याचं सूट सैफ अली खानने एकच टेकमध्ये पूर्ण केल्याचा खुलासा सैफ आली खानने केला. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांचं लग्न 13 वर्ष टिकलं. 2004 मध्ये तिघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा ENG vs AFG: इंग्लंडच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाला संजीवनी; जाणून घ्या कोण जाणार सेमीफायनलमध्ये..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम