IND vs SL Asia Cup 2023 Final: फायनलसाठी राखीव दिवस नाही, उद्या सामना रद्द होण्याची शक्यता; सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी..
IND vs SL Asia Cup 2023 Final: भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये उद्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. उद्या क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेचा विजेता कोण होणार? हे पाहायला मिळणार असलं तर, उद्या पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी रिझर्व-डे ठेवला नसल्यामुळे आता अशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना संकटात सापडला आहे.
अनेक क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्येच आशिया स्पर्धेचा अंतिम सामना पार पडवा असं वाटत होतं. मात्र श्रीलंका संघाने पाकिस्तान संघाला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनल भारत आणि श्रीलंका या दोन संघामध्ये पार पडेल. असं असलं तरी श्रीलंकेमध्ये हा सामना खेळवला जाणार असल्याने, पाऊस पुन्हा एकदा सामन्यात व्यत्यय आणणार आहे.
श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या प्रत्येक सामन्यात पावसाने आपली हजेरी लावली आहे. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अंतिम सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आला नाही. उद्या एकही चेंडू पडला नाही तर सामना अनिर्णित घोषित करण्यात येईल.
सामना जर ड्रॉ झाला, तर अशिया कप स्पर्धेची ट्रॉफी कोणत्या संघाला देण्यात येईल? याविषयी मोठी संभ्रमता क्रिकेट चाहत्यांना पडल्याचे पाहायला मिळते. तर उद्या 17 तारखेला एकही चेंडू झाला नाही, आणि सामना रद्द झाला, तर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन्हीं संघांना सहविजेता घोषित करण्यात येईल.
आतापर्यंतच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये एकदाही आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला नाही. यावेळी मात्र ही संधी होती. परंतु श्रीलंका संघाने पाकिस्तान संघाला धूळ चारत पाकिस्तान संघाचे आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. उद्या भारत आणि श्रीलंका या दोन संघात सामना झाला तर कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा Asia Cup 2023 Final: भारताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारला! श्रीलंकेला पराभूत करणं आता अशक्य; जाणून घ्या फायनलचं गणित..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम