Bharat: आपल्या देशाला भारत आणि इंडिया ही दोन्हीं नावे कशी पडली? फारच रंजक आहे इतिहास, वाचा सविस्तर..
Bharat: देशात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या मुद्द्यावरून केंद्र सरकार बॅकफूटवर असल्याचे पाहायला मिळतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. आणि त्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन थेट मंत्री पदावर बसवतात. हे आता सर्वसामान्याच्याही लक्षात आलं आहे. देशातील स्वायत्त संस्थांची चौकशी केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच केली जाते. हा समजही आता फार खोलवर जाऊन रुजू झालाय.
आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha election) होऊ घातल्या असल्याने, आता भाजप निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पाच दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पाच दिवसाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता इंडिया हा शब्द संविधानातून हटवला जाणार असून, त्याऐवजी भारत हा शब्द वापरला जाणारा असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र इंडिया (india) आणि भारत (bharat) ही दोन नावे आपल्या देशाला कशी पडली? याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर वाचा सविस्तर..
देशातली नागरिक आपल्या देशाला भारत आणि इंडिया (Bharat and India) असाही उल्लेख करतात. भारत हे नाव आपल्या देशाला भरत राजाच्या नावावरून पडल असल्याचं सांगितलं जातं. हजारो वर्षांपूर्वी भरत आपल्या देशाचा राजा होता. भरत दुष्यंत आणि शकुंतला या दोघांचा पुत्र होता. भरत या नावाचा उल्लेख महाभारताच्या आधी पर्वात देखील असल्याचं पाहायला मिळतं. महाकवी कालिदास यांचे शाकुंतल नाटक देखील भरताच्या जन्म कहाणीवरच असल्याचं पाहायला मिळते.
भरत या राजाचे मूळ नाव “सर्वदमन” होते. मात्र महाभारतामध्ये त्यांचे नाव हे भरत असे ठेवले. कुरु आणि राजा पंडू वंशाचा हा वंशज होता. त्यामुळे व्यासांनी त्याच्यावर आधारित त्यांच्या महाकाव्याला महाभारत असं नाव दिले. संस्कृतमध्ये “भारत” या शब्दाचा अर्थ पाहायलाच झाला तर “भा” चा अर्थ होतो ज्ञान किंवा प्रकाश, आणि “रत” या शब्दाचा अर्थ होतो, समर्पित झालेला. त्यानंतर देशाच्या संविधानाने देखील हा शब्द वापरला.
असं पडलं इंडिया नाव
इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर, भारत हे नाव त्यांना बोलण्यासाठी जड जायला लागलं. त्यानंतर “सिंधू खोरे” या नावावरून त्यांनी भारताला इंडिया असं म्हणाल्या सुरुवात केली. मात्र तेव्हा देखील आपल्या देशाचे स्वातंत्र्य सैनिक भारत नावाचा उल्लेख करत असत. भारत या नावाबरोबर तेव्हा हिंदुस्तान असे देखील म्हटले जायचे. मात्र हिंदुस्तान हे नाव देखील त्यांना बोलायला अवघड जायचं. आणि म्हणून सोपं वाटावं यासाठी त्यांनी इंडिया असं म्हणायला सुरुवात केली.
हे देखील वाचा Green Chilli: बाजारातून आणल्यानंतर हिरवी मिरची लगेच सुकते, लाल पडते? मग वापरा ही स्ट्रिक, मिरची राहील हिरवीगार..
AFG vs SL: थोडक्यात पराभव झाला आणि राशिद खान रडू लागला; पाहा शेवटच्या दोन मिनिटात कसा खेळ पालटला..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम