अखेर शिवसेनेला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी चिन्ह मिळाले.
निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेला हवे असणारे चिन्ह काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने दिले नव्हते. निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले होते. शिवसेनेने या चिन्हावरती नापसंती दाखवली होती. शिवसेनेकडून तीन पर्याय देण्यात आले होते; ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, बॅट आणि गॅस सिलेंडर हे तीन पर्याय शिवसेनेने निवडले होते, परंतु निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले होते. हे पर्यायी शिवसेनेकडून पत्राद्वारे दिले गेले होते. मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह शिवसेनेला देण्यात आले आहे.
गॅस सिलेंडर, बॅट व ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी ही तिन्ही चिन्हे इतर पक्षांकडून आरक्षित असल्यामुळे शिवसेनेला वरील चिन्हे देता आली नाहीत. तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह देत आहोत असे निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला कळविण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह शिवसेनेला पसंत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पन्नास जागा लढविण्यासाठी तयार आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हाला नितीशकुमार यांच्या जेडीयू ने आक्षेप घेतला होता. कारण जेडीयूचे चिन्ह आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह यामध्ये साम्य आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हामुळे आमची मते शिवसेनेला जातात असा जेडीयूचा आक्षेप होता. हा अाक्षेप निवडणूक आयोगाने ग्राह्य धरला होता व शिवसेनेला प्री सिम्बॉल म्हणून बिस्किट हे चिन्ह दिले होते मात्र त्याला शिवसेनेने नकार दिला होता. आता शिवसेना बिहार मध्ये तुतारी वाजवणारा मावळा या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम