IND vs PAK Asia Cup 2023: या चार कारणामुळे आज भारताचा पराभव निश्चित; अशी असेल पाकिस्तान विरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन..
IND vs PAK Asia Cup 2023: अशिया कप (Asia Cup) स्पर्धेचा तिसरा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघानी कसून सराव केला आहे. मात्र पाकिस्तान या सामन्यात वरचढ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा भारत आणि पाकिस्तान सामना प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार असला, तरी भारतीय प्रेक्षकांची निराशा होऊ शकते. आजच्या सामन्यात पाकिस्तान कमालीचा सरस आहे. एक नजर टाकूया, दोन्हीं संघाच्या कमकुवत आणि जमेच्या बाजूवर..
वर्ल्ड कपच्या (world Cup 2023) दृष्टीने आशिया चषक स्पर्धा भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वर्ल्ड कपची तयारी म्हणून, या स्पर्धेकडे पाहिलं जात असलं तरी भारतीय संघाची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. केएल राहुलच्या (kl Rahul) दुखापतीमुळे ही समस्या आणखीन वाढली आहे. भारतीय संघासमोर फलंदाजी बरोबर गोलंदाजीची देखील समस्या असणार आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तान संघ दोन्ही क्षेत्रात समतोल वाटतोय.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी अनेकदा संघाच्या जिंकण्याच्या शक्यतेवर भाष्य करता येऊ शकतं. दोन्ही संघांवर एक नजर टाकली, तर भारतीय संघ पाकिस्तान संघापेक्षा कमकुवत वाटत आहे. भारतीय संघात अनेक स्टार खेळाडू असले तरी फलंदाजीच्या क्रमांकाचा मोठा घोळ आहे. शिवाय मिडल ऑर्डरची मोठी समस्या भारतीय संघासमोर आहे.
नेपाळ विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने मोठा विजय संपादन केला. पहिल्या विजयाची लय पाकिस्तानचा संघ दुसऱ्या सामन्यात देखील घेऊन उतरणार आहे. फलंदाजीत पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा समतोल वाटतोय, त्याचे कारण म्हणजे त्यांची मधली फळी आणि टॉप ऑर्डर देखील फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान या क्षेत्रात भारतीय संघाला वरचढ आहे.
भारताच्या बॅटिंग ऑर्डरचा विचार करायचा झाल्यास, सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) शुभमन गिल (Shubman Gill) आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज (Virat kohli) Virat kohli वगळता भारताच्या इतर फलंदाजाचे क्रमांक अद्यापही निश्चित झालेले नाहीत. शिवाय प्रदीर्घकाळानंतर, श्रेयस अय्यर (shreyas Iyer) भारतीय संघात परतला असल्याने, त्याचा फॉर्म हाही मोठा प्रश्न आहे. विकेटकीपर म्हणून ईशान किशनला (ishan Kishan) संधी मिळू शकते. मात्र ईशान किशन मिडल ऑर्डरमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे.
टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट म्हणून आपली छाप पडणारा सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav) देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडू शकला नाही. केवळ मधली फळीच नाही, भारताचे सलामीवीर देखील लईत नाहीत. शिवाय पाकिस्तान संघाचा जलदगती गोलंदाजीचा फॉर्म आणि क्वालिटी पाहता भारतीय संघाचे सलामीवीर स्वस्तात बाद होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सलामीवीर लेप्ट आर्म स्पेसरचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. चेंडू स्विंग होण्यासाठी मदत असणाऱ्या खेळपट्ट्यावर लेफ्ट आर्म स्पेसरनी भारतीय सलामीवीरांची पळता भुई केली आहे. आजच्या सामन्यातही याची पुनरावृत्ती क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळू शकते. आजचा सामना क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट आणि Disney+ Hotstar या OTP ॲपवर दुपारी तीन वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे.
असा असेल पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ..
रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव/ प्रसिद्ध कृष्णा, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमहरा,मोहम्मद सिराज
हे देखील वाचा IND vs PAK Asia Cup: पाकिस्तान विरुद्ध रोहितची विचित्र खेळी भोवणार; ..म्हणून इशानसाठी शुभमन, विराटचा जाणार बळी..
IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम