Asia Cup 2023 squad: ..म्हणून भाजपच्या खासदाराने मोहम्मद शमीच्या निवडीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला त्याच्या जागी..
Asia Cup 2023 squad: आशिया चषक (asia Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाची (indian team) नुकतीच निवड करण्यात आली आहे. अजित आगरकरच्या (ajit agarkar) अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संघ निवडीवर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 30 ऑगस्ट पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. एकीकडे अनेकांकडून संघ निवडीवर टिका होत असतानाच, आता थेट भाजपच्या खासदारानेच मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय निवड समितीने एकूण 17 सदस्यांचा संघ निवडला आहे. हाच संघ आता आगामी विश्वचषकासाठी (world Cup) देखील असेल. गेल्या काही वर्षापासून सातत्याने निवड समितीवर संघ निवडी वरुन टीका होताना पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी मिळालेली नव्हती. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी संघात त्याची निवड करण्यात आली, मात्र त्याला एकही टी ट्वेंटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
आता पुन्हा एकदा भारतीय विश्वचषक संघात चहल नसणार असल्याचं, जवळपास स्पष्ट झाले आहे. अशातच आता भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टार पोर्टच्या एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला, विश्वचषक भारतात होणार असल्याने, भारतीय संघात जलदगती गोलंदाजांचा इतका महत्त्वाचा रोल नसणार आहे.
भारतीय खेळपट्टया या नेहमी स्पिन गोलंदाजांना साथ देणाऱ्या राहिल्या आहेत. भारतीय संघामध्ये एक अतिरिक्त लेग स्पिनर असायला हवा होता. मोहम्मद शमीच्या जागी निवड समितीने रवी बिष्णोई किंवा युझवेंद्र चहलची निवड करणे योग्य ठरले असते. पुढे बोलताना गंभीर म्हणाला, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बॅकअप म्हणून शिवम दुबे ची देखील निवड व्हायला हवी होती.
गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे आता नवा वाद देखील निर्माण झाला आहे. गौतम गंभीर भाजपचा खासदार असल्याने, सोशल मीडियावर गंभीर मोहम्मद शमीला पसंत करत नसल्याचा आरोप लावला जात आहे. मोहम्मद शमी केवळ मुसलमान असल्याने, गौतम गंभीरच्या निशाणावर आहे. असा देखील आरोप होत आहे.
हार्दिक पांड्याचा बॅकअप हा शार्दुल ठाकूर (shardul Thakur) कधीही होऊ शकला नसता. हार्दिक पांड्याचा बॅकअप शिवम दुबे (shivam Dube) असल्याचे मत गौतम गंभीरने नोंदवलं. गौतम गंभीरने शार्दुल ठाकूर, शमी या दोघांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केल्याने, तो सोशल मीडियावर ट्रेड देखील झाला. याबरोबरच गौतम गंभीरवर सोशल मीडियावर टीका देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम