राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण का करून दिली?

0

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं मंदिरे खुली करावी,यासाठी विविध ठिकाणी भाजपानं घंटानाद आंदोलन केलं होतं. यासंदर्भात महाराष्ट्रातल्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट देखील घेतली होती. परंतु महाराष्ट्र सरकारकडून कोरोनाची परिस्थिती पाहता अद्यापतरी मंदिरं खुली करता येणार नाहीत,असं सांगण्यात आलं होतं.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर ते या सरकारचा द्वेश करत असल्याची टीका वारंवार झाली. राज्यपालांचं नेहमी महाराष्ट्र सरकारच्या धोरणाविरोधी मत का असतं? असा सवालही अनेकांकडून उपस्थित करण्यात आल्याचे पाहिला मिळाले होते.

आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला पत्राद्वारे केलेल्या सूचनांमुळे राज्यपाल चर्चेत आले आहेत. बार,रेस्टॉरंट मुख्यमंत्र्यांनी सुरू केले. परंतु देव कुलूप बंद का? असा सवाल राज्यपाल कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारला.

राज्यपाल कोषारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्या पत्राद्वारे त्यांना हिंदुत्त्वाची आठवण करून देत तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहात. याचा तुम्हाला विसर पडलाय का? असा सवालही कोशारींनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

मंदिरं सुरू करण्याबाबत सूचना देत कोशारींनी मंदिर सुरू नयेत,अशी दैवी संकेतं तर मिळत नाही ना? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला. कोशारींनी तुम्ही राम जन्मभूमी अयोध्याला गेला,पांडुरंगाची पूजा देखील केली. याची आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून देण्यास राज्यपाल कमी पडले नाहीत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.