IND vs WI 4th T20: ..म्हणून आजच्या सामन्यात गिलला मिळणार डच्चू; खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने संघात हे बदल..

0

IND vs WI 4th T20: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 4th T20) यांच्यामध्ये आज चौथा T20 सामना अमेरिकेत (USA) पार पडणार आहे. वेस्ट इंडीज संघाने पाच T20 सामन्याच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतल्याने त्यांच्याकडे आज मालिका विजय साकारण्याची मोठी संधी आहे. आज चौथा T 20 सामना अमेरिकेत खेळला जाणार आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा (Lauderhill, Florida) ही खेळपट्टी फलंदाजीसाठी कमालीची अनुकूल असल्याने क्रिकेटचा चाहत्यांना आजचा सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकतो. (IND vs WI 4th T20)

तीनही T20 सामन्यात भारतीय सलामी जोडी अपयशी ठरली आहे. पहिल्या T20 सामन्यानंतर, संघात यशस्वी जयस्वालचा (Yashasvi Jaiswal) संघात समावेश करण्यात आला. मात्र दोन्ही T-20 सामन्यात यशस्वी जयस्वाल अपयशी ठरला. दुसरीकडे शुभमन गिल (Shubman Gill) देखील सपशेल अपयशी ठरला आहे. मालिका पराभव टाळण्यासाठी शुभमन गिल ऐवजी ईशान किशनला (ishan Kishan) सलामीची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Ishan Kishan Back the Indian squad)

लॉडरहिल, फ्लोरिडा (Lauderhill, Florida) ही खेळपट्टी फलंदाजीसाठी कमालीची अनुकूल आहे. भारतीय संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. भारत आजच्या सामन्यात पराभूत झाला, तर मालिका पराभवाची नामुष्की भारतीय संघावर येऊ शकते. साहजिकच त्यामुळे एका अतिरिक्त जलदगती गोलंदाजाचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल असल्याने, अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता पडणार आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने आजचा सामना हायस्कोरिंग राहणार आहे. आणि म्हणून गोलंदाजी मजबूत करणे आवश्यक आहे. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर सगळ्याच फलंदाजांना खेळण्याची संधी मिळत नाही. ही बाब टीम मॅनेजमेंट विचारात घेऊन एक अतिरिक्त गोलंदाजाचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

दोन्ही t20 सामन्यात अपयशी ठरलेल्या यशस्वी जयस्वालला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. आयपीएल नंतर शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरला आहे. साहजिकच त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात अधिक रिस्क नको, म्हणून इशान किशनला सलामीची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ऐवजी जलदगती गोलंदाज आवेश खानला (avesh Khan) संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा पराभव होण्याची शक्यता 

अमेरिकेमधील लॉडरहिल, फ्लोरिडा (Lauderhill, Florida) ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने भारत या सामन्यामध्ये बॅकफूटवर आहे. त्याचे कारण म्हणजे, भारताचे दोन्ही सलामीवीर लयीत नाहीत. याशिवाय भारतीय संघाची मधली फळी देखील फारशी फॉर्ममध्ये नाही. तिलक वर्मा (Tilak Varma) आणि सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात दमदार कामगिरी केली असली तरी भारतीय संघाला हा सामना दोघांच्या जीवावर जिंकता येणे अवघड आहे.

चौथा टी ट्वेन्टी सामना क्रिकेट चाहत्यांना हायस्कोरिंग पाहायला मिळू शकतो. या मैदानावर 220, 230 धावा आरामात चेस करता येतात. वेस्टइंडीज संघाचे फलंदाज एकाहून एक पावर हीटर असल्याने, या सामन्याचे पारडे वेस्टइंडीजच्या बाजूने झुकलेले आहे. क्रिकेट चाहत्यांना रात्री आठ वाजल्यापासून हा सामना जिओ सिनेमा (JioCinema) या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

असा असेल अंतिम अकराचा संघ

हार्दिक पंड्या (कॅप्टन) सूर्यकुमार यादव (उपकॅप्टन) यशस्वी जैस्वाल, इशान किशन टिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

हे देखील वाचा Tilak Varma: तिलक वर्माच्या कामगिरीवर रोहितचे मोठे विधान; एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे संकेत..

ICC ODI World Cup 2023: युवराज म्हणतोय ते खरंच आहे, आम्ही सेट नाही; रोहितने मान्य केली युवराजने सांगितलेली ती गोष्ट..

Hyundai Exter: TATA, MARUTI एसयूव्हीचा उठला बाजार; Hyundai च्या Exeter SUV चे महिन्यातच 50 हजार बुकिंग..

Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत; ती तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..

Soaked Peanuts Benefits: रोज मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा, त्या गोष्टी बरोबरच मिळतील आरोग्याचे अनेक फायदे..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.