ICC ODI World Cup 2023: युवराज म्हणतोय ते खरंच आहे, आम्ही सेट नाही; रोहितने मान्य केली युवराजने सांगितलेली ती गोष्ट..
ICC ODI World Cup 2023: 30 ऑगस्टपासून आशिया कप asia (Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेची पहिली पायरी म्हणून, आशिया कप स्पर्धेकडे पाहिले जात आहे. 50 षटकाच्या वर्ल्डकपला दोन महिन्या पेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे. अनेक इंटरनॅशनल क्रिकेट संघांनी ODI विश्वचषकासाठीचा आपला संघ देखील घोषित केला आहे. मात्र अद्यापही भारतीय क्रिकेट संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल, हे स्पष्ट नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील आम्ही गेल्या काही काळानपासून चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तयार करू शकलो नाही, हे मान्य केला आहे. काही दिवसांपूर्वी इंद्रनील बासू या क्रिकेट पत्रकाराला युवराज सिंगने (Yuvraj singh) मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये युवराज सिंगने कर्णधार किती चांगला असला तरी त्याच्याकडे उत्तम टीम नसेल, तर मोठी स्पर्धा जिंकता येणार नाही. असं स्पष्ट केले.
या मुलाखतीत पुढे बोलताना युवराज सिंग म्हणाला, अजूनही आपल्याकडे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज सेट झालेला नाही. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांनी ठीकठाक कामगिरी केली आहे. मात्र दुखापतीनंतर हे दोघेही भारतीय संघात परतणार की नाही, हेही अस्पष्ट आहे. जर ते भारतीय संघात परतले तर त्यांचा फॉर्म कसा राहतो? यावर देखील खूप काही अवलंबून असणार आहे.
युवराज सिंगने (Yuvraj Singh) केलेले हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील यावर भाष्य केले आहे. रोहित म्हणाला, बऱ्याच काळापासून आम्ही अद्याप चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तयार करू शकलो नाही. युवराज सिंग नंतर भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
परंतु, श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकासाठी चांगली कामगिरी केली आहे. आकडे देखील त्याचे चांगले आहेत. परंतु तो दुखापतीमुळे बऱ्याच महिन्यांपासून बाहेर असल्याने, आमच्यासमोर चौथ्या क्रमांकाचे आव्हान असेल असे रोहित म्हणाला.
आशिया चषक स्पर्धेपूर्वी जर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर भारतीय संघात परतले नाही, त्याचबरोबर पूर्णपणे फीट नसतील तर त्यांच्या जागेवर सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) संजू सॅमसन (Sanju Samson) तिलक वर्मा (Tilak Varma) या तीन पर्यायांचा विचार केला जाणार आहे.
यामध्ये सगळ्यात आघाडीवर तिलक वर्माचे नाव आहे. भारतीय संघामध्ये मधल्या फळीत कोणताही डावखुरा फलंदाज नाही. शिवाय सूर्यकुमार यादवचे एकदिवसीय क्रिकेट मधील आकडे देखील चांगले नाहीत. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी तिलक वर्माची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा ICC world Cup 2023: कर्णधार चांगला असाल तरी वर्ल्ड कप जिंकण्याचं गणित वेगळं; युवराजने थेट टीमच्या वर्मावरच बोट ठेवलं..
Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत; ही तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम