आईने दिला तब्बल सोळाव्या मुलाला जन्म!
मध्यप्रदेश मधील डोमोह जिल्ह्यात एका 45 वर्षे महिलेने तब्बल सोळाव्या मुलाला जन्म देण्याची अजब घटना घडली आहे. या घटनेची माहिती सोशल हेल्थ अॅक्टिविस्ट कालो बाई विश्वकर्मा या महिलेने दिली आहे.
डामोह जिल्ह्यातील पाडाझिर या गावात ही घटना घडली आहे. सोळाव्या मुलाला जन्म देणाऱ्या आईचे नाव सुख्रानी अहिरवाल असं आहे. जन्म दिल्यानंतर माय लेकरं दोघांचीही प्रकृती खालावत चालल्याने त्यांना जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या दोघांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. आणि दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला.
या अगोदर या महिलेने पंधरा मुलांना जन्म दिला होता. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल हेल्थ अॅक्टिविस्ट कालो बाई विश्वकर्मा यांनी दिली. विश्वकर्मा या महिलेने दिलेली माहिती खरी असल्याची पुष्टी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता त्रिवेद यांनी केली.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम