SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

0

SSC JE Recruitment 2023: देखील नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission junior engineering) अंतर्गत ज्युनिअर इंजीनियरिंग या पदासाठी मेगा भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांना 16ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली असून, एकूण एक हजार तीनशे 24 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (SSC JE Recruitment 2023)

जागांचा तपशील

1324 रिक्त जागा एकूण चार विभागात भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सिविल या पदासाठी एकूण 1095 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत “मेकॅनिकल” या पदासाठी एकूण 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “इलेक्ट्रिकल्स अँड मेकॅनिकल” या पदासाठी एकूण 73 जागा भरण्यात येणार आहेत. “इलेक्ट्रिकल” या पदासाठी 125 जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

“स्टाफ सिलेक्शन कमिशन” अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, वरील चारही पदांसाठी एकच शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पदवी आणि डिप्लोमा पूर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय हे 1 जानेवारी 2023 पर्यंत 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये एससी/ एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट दिली जाईल. जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी शंभर रुपये परीक्षा फी असेल. तर एससी/ एसटी पीडब्ल्यूडी/ तसेच महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अभ्यासक्रम

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी एकूण तीन विषय देण्यात आले आहेत. ज्याच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, तर्क, सामान्य जागरूकता असे विषय असतील. त्याचबरोबर तांत्रिक विषयाविषयी बोलायचं झालं तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल स्ट्रक्चरल असे विषय असतील.

पगार आणि नोकरी ठिकाण

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांना दरमहा 35 हजार 400 पासून एक लाख बारा हजार चारशे रुपये पर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

असा करा अर्ज

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://ssc.nic.in/ असं सर्च करा. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला सविस्तर अर्ज करता येईल. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Rohit Sharma: ..म्हणून भारत वर्ल्डकप जिंकण्यास लायक नाही; पहिल्याच सामन्यात झाल्या कधीही भरून न निघणाऱ्या या चुका..

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.