Seema Haider: प्रेम नव्हे सापळा! सीमा हैदरच्या ATS चौकशीतून धक्कादायक माहिती समोर..
Seema Haider: एखाद्या चित्रपटाच्या लव स्टोरीला देखील फिकी पाडेल, अशी घटना भारतामध्ये घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन (Seema and Sachin love story) फक्त भारतातच नाही, तर अनेक देशात चर्चेचा विषय बनली आहे. त्याला कारणही तसेच आहे. 2019 मध्ये PUBG खेळताना या दोघांची ओळख झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे, सचिन हा भारताचा नागरिक आहे. तर सीमा ही पाकिस्तानची नागरिक आहे. (Seema Haider and achin love story)
भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) या दोन्ही देशांचे संबंध किती ताणले गेलेले आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून सीमा हैदर केवळ प्रेमासाठीच भारतामध्ये सचिनला भेटण्यासाठी आली की, या पाठीमागे आणखी काही मोठा डाव आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP police) दोघांची चौकशी करून सोडण्यात देण्यात आलं होतं. मात्र आता ATS पथकाने सीमाला अटक केली आहे.
पाकिस्तान मधून सीमा भारतात आली कशी..?
2019 मध्ये सचिन आणि सीमाची PUBG येताना ओळख झाली. सचिनला भेटण्यासाठी सीमा पासपोर्ट शिवाय भारतात आल्याने अनेकांना धक्का बसला. सीमा भारतामध्ये कशी आली, या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी माहिती दिली आहे. सीमा 13 मे 2023 ला नेपाळ मार्गे भारतामध्ये आली. आपल्या चार मुलांना घेऊन काही एजंटच्या माध्यमातून सीमाने भारतामध्ये प्रवेश केला.
नेपाळमध्येच केले लग्न..
सीमा आणि सचिन या दोघांनी नेपाळमध्येच लग्न केले. पाकिस्तान मधून नेपाळमध्ये प्रवेश करून सीमा एक दिवस अगोदर काठमांडू विमानतळावर सचिनची वाट पाहत होते. PUBG च्या माध्यमातून दोघेही फोन कॉलवर देखील बोलत असल्याने, दोघांची चांगली ओळख झाली होती. सचिनला पाहताच तिने ओळखले. आणि दोघांनी एकमेकांसोबत लग्न करून पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेतले.
काय करतो सचिन..
ग्रेटर नोएडा (noida) मधील रबूपुरा या भागामध्ये सचिन किराणा स्टोअर्स चालवतो. सचिन आणि सीमा हे दोघेही याच ठिकाणी राहतात. पासपोर्ट शिवाय नेपाळ मार्गे भारतामध्ये आपल्या चार मुलांसह सीमाने प्रवेश केला. आणि म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी चार जुलै रोजी तिला अटक केली. बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या सीमाला सचिनने आश्रय दिला, म्हणून त्याला देखील पोलिसांची अटक केली. मात्र काही दिवसांपूर्वी चौकशीनंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले होते. परंतु आता ATS ने सीमाला अटक केली आहे.
सीमाला अटक केल्यानंतर, आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तीनी गुप्तचर संस्था ISI सोबत सीमाचे कलेक्शन असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आणि याच धर्तीवर तिची ATS कडून चौकशी सुरु आहे. WhatsApp chat तसेच इतर काही कागदपत्रांच्या आधारे तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या माध्यमातून सीमा ही एका पाकिस्तानी सैनिकाची बहीण असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच तिचे काका देखील लष्करामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत आहेत असा देखील धक्कादायक खुलासा झाला आहे.
हे देखील वाचा Health benefits of crying: कधीही न रडण्याचा आरोग्यावर होणार दुष्परिणाम वाचून बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम