Realme Smartphone: 100MP dual camera असणारा Realme स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मिळतोय डिस्काउंटमध्ये; पाहा डिटेल्स..

0

Realme Smartphone: अलीकडच्या काळात Realme स्मार्टफोन कंपनीने ग्राहकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. कंपनीने आता Realme 11 Pro 5G सिरीज लॉन्च केली आहे. Realme 11 Pro 5G त्याचबरोबर Realme 11 Pro+ 5G असे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले असून, हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. जाणून घ्या सर्व डिटेल्स.

फीचर्स

रिअलमी ११ प्रो ५ जी या स्मार्टफोनला कंपनीने ६.७ इंच fhd कर्व्ह डिस्प्ले दिला आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोनमध्ये octa core 6nm media tech डाइमेंसिटी 7050 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्सकरिता Mali-H68 GPU देखील दिले आहे. यामध्ये १२GB रॅम आणि 112GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच हा स्मार्टफोन Android१३ वर आधारित Realme UI 4.0 स्किनसह काम करतो.

100MP camera

कंपनीने Realme 11 Pro 5G या स्मार्टफोनला तब्बल 100MP dual camera setup दिला आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा OIS सह येतो. त्याचबरोबर 2mp असणार दुसरा सेन्सर कॅमेरा दिला आहे. सोबतच सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी 16mp फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनला कंपनीने बॅटरी देखील दमदार दिली आहे. ५००० mAh असणारी ही बॅटरी १००W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे.

किंमत आणि ऑफर्स

कंपनीने realme 11 Pro 5G हे व्हेरियंट तीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये ग्राहकांना 8/128 जीबी स्टोरेज, त्याचबरोबर 8/256 जीबी स्टोरेज,आणि 12/256 जीबी स्टोरेज मिळणार आहे. अनुक्रमे या व्हेरियंटची किंमत 23 हजार 999 रुपये, 24 हजार 999 रुपये, आणि 27 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट बरोबर Realme.com या वेबसाईटवरून देखील खरेदी करता येणार आहे. कॉपर विषयी सांगायचं झाल्यास, ग्राहकांनी जर एचडीएफसी (HDFC) त्याचबरोबर आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या कार्डद्वारे या स्मार्टफोनचे पेमेंट केले, तर ग्राहकांना दीड हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला हॉलिबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.