या तारखे आधीच एकनाथ खडसे करणार पक्षप्रवेश?
गेले अनेक दिवस नाराज असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. कधीकाळी जमीन घोटाळ्यात खडसे यांना आपले मंत्रिपद सोडावे लागले होते. तेव्हापासून त्यांचे व देवेंद्र फडणवीस यांचे शीतयुद्ध सुरू झाले आहे. खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याची संधी सोडत नाहीत.
खडसे यांच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला मंत्रिपद व पक्षाच्या कार्यकारणी मधून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेले तीन-चार दिवस खडसे मुंबईमध्ये दाखल होते ते पुन्हा रविवारी जळगाव मध्ये परतले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेशाबाबत खडसे यांना विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी या विषयावरती मौन बाळगणे पसंत केले. जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार का असे खडसे यांना विचारले असता सर्व आता सांगून कसे जमेल? असे म्हणून सस्पेन्स ठेवला आहे. हा कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी आहे तोपर्यंत खडसे राष्ट्रवादी मध्ये जातील का? की भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटतील, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम