Naveen-ul-haq: नवीन-उल-हकचा माज काही कमी होईना; विराट बाद झाल्यानंतर काल पुन्हा असं डिवचलं..
Naveen-ul-haq: आयपीएल 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यावर आली असून येत्या दोन दिवसात अंतिम चार संघ निश्चित होताना पाहायला मिळतील. गुणतालिकेत कमालीच्या उलट-फेर होताना पाहायला मिळत आहे. काल आयपीएलच्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबी संघाचा धुव्वा उडवत दिमाखदार विजय संपादन केला. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अधिक घट्ट झाल्या आहेत. या सामन्याची जितकी चर्चा झाली, त्याहून अधिक चर्चा मैदानाबाहेर देखील झाली.
विराट कोहली (Virat kohli) आणि आणि लखनऊ संघाचा खेळाडू नविन-उल-हक या दोघांची चांगलीच बाचाबाची झाली होती. मैदानावर गरमा-गरमी झाल्यानंतर सामना संपल्यानंतरही विराट कोहली आणि नवीन-उल-हलचं भांडण झालं होतं. त्यानंतर गौतम गंभीरने देखील विराटशी पंगा घेतला होता. हे प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा एकदा नवीन उल हकने काल मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर, त्याला डिवचले आहे.
विराट कोहलीशी सहसा कोणी पंगा घेत नाही. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर ओळख निर्माण केली आहे. जगात सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे सामने विराट कोहलीने भारतीय संघाला एकहाती जिंकून दिले आहेत. साहजिकच विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं असताना नवख्या अफगाण खेळाडू नवीन-उल-हकने विराटशी पंगा घेतल्याने, या घटनेची देशभरात सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.
नवीन-उल-हक हे नाव कोणाला फारसं महित नव्हतं. मात्र विराट कोहलीशी पंगा घेतल्यानंतर, हे नाव अनेकांना माहिती झालं. कदाचित यामुळेच नवीन उल हकने पुन्हा एकदा विराट कोहलीला डिवचले आहे. काल खेळल्या गेलेल्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर, नवीनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करत विराटची पंगा घेतला.
विराट कोहली बाद झाल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवून नवीन-उल-हकने कॅप्शन लिहीलं, sweet mango’s हे कॅप्शन लिहीत असताना त्याने मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धचा सामना पाहत असल्याचं दाखवलं आहे. नवीन एवढ्यावरच थांबला नाही. मुंबई इंडियन्स संघाची बॅटिंग आल्यानंतर, दुसऱ्या डावात देखील त्याने विराट कोहलीशी पंगा घेतला.
Naveen ul Haq is making kohli taste his own medicine.
We have to give it to Naveen, he is from a poor country, he got the IPL contract for the first time this year.
He is not concerned about his career in IPL, he is just fighting for its own cause.
So much to learn from him.… pic.twitter.com/CmoSxW2Olp
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) May 9, 2023
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात गुजरात संघाच्या सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केल्यानंतर विराट कोहलीने देखील इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. वृद्धिमान सहाने दमदार फलंदाजी केल्यानंतर, मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट इनिंग असं कॅप्शन विराट कोहलीने लिहिलं होतं. मुंबई संघाला सामना जिंकण्यासाठी आठ धावांची आवश्यकता असताना, नवीन उल हकने सामन्याचा फोटो पोस्ट केला. आणि या फोटोला विराट कोहलीने ठेवलेलं कॅप्शन म्हणजेच, मी पाहिलेले आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट आंबे असं कॅप्श ठेवलं.
हे देखील वाचा How to track location: या ट्रिकच्या मदतीने जाणून घ्या जोडीदाराचे लाईव्हलोकेशन..
वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम