आमदार अमोल मेटकरी यांचे चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रतिउत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात अजित पवारांवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना पुणे महापालिका सत्तेविषयी काही स्वप्न पडत असेल तर, त्यांनी याविषयी ऊर्जा वाया घालवू नये, आम्ही तुमचे बाप आहोत,अशी टीका केली होती. या टीकेला मिटकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार हेच बाप आहेत. भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून त्यांनी हे सिद्धही केले आहे,असे मिटकरी म्हणाले.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुणेकर,अजितदादा हेच तुमचे बाप आहोत. हे सिद्ध करून दाखवल्या शिवाय राहणार नाहीत. असा टोलाही अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
दोघांमधील या शाब्दिक युद्धानंतर आता आणखी कोण काही बोलतंय का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम