IGNOU Recruitment 2023: 12वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात इतक्या जागांची भरती..

0

IGNOU Recruitment 2023: जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल, आणि नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात काही रिक्त जागांची भरती निघाली असून, यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना २० एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात एकूण २०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये “ज्युनियर असिस्टंट कम-टायपिस्ट” या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जाणून घेऊया, या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता;

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात भरण्यात येणाऱ्या 200 रिक्त जागांसाठी उमेदवारांची पात्रता बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. सोबतच उमेदवाराने एका मिनिटांत 40 शब्द टाईप करणे आवश्यक आहे. याबरोबरच उमेदवाराने हिंदी टायपिंग एका मिनिटांमध्ये 30 शब्द टाईप करणे गरजेचे आहे. आता आपण या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा काय ठेवली आहे? हे जाणून घेऊ.

वयोमर्यादा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात नोकरी करण्यासाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा जाणून घेऊ. 31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय हे 18 ते 27 यादरम्यान असणे आवश्यक आहे. सोबतच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर एससी/ एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना, प्रवर्गानुसार परीक्षा फी आकारली जाणार आहे. यामध्ये जनरल तसेच ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये परीक्षा फी असणार आहे. तसेच एससी/एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये परीक्षा फी आकारली जाईल. सोबतच महिला आणि पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांसाठी देखील सहाशे रुपये परीक्षा फी असेल.

वेतन/ नोकरीचे ठिकाण

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात निवड केल्या गेलेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 900 ते 63 हजार दोनशे पगार दिला जाणार आहे उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करावी लागणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेची निवड कशी केली जाणार? हे देखील जाणून घेऊ.

निवड प्रक्रिया

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा, कौशल्या चाचणी, दस्तावेज पडताळणी, आणि वैद्यकीय तपासणी या प्रकारचा समावेश असणार आहे. आता आपण ऑनलाइन अर्ज कसा करायचा जाणून घेऊ.

असा करा अर्ज

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.ignou.ac.in असं सर्च करा. यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे. ११:५० पर्यंतच ही मुदत असणार आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

RBI Recruitment 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत या उमेदवारांसाठी मेगा भरती; परिक्षेशिवाय अशी केली जाणार..

EPFO Recruitment 2023: बारावी आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; या विभागामध्ये 2859 जागांसाठी भरती..

Samsung Galaxy S20 FE 5G: 75 हजाराचा हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 30 हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.