RBI Recruitment 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत या उमेदवारांसाठी मेगा भरती; परिक्षेशिवाय ‘अशी’ केली जाणार..

0

RBI Recruitment 2023 : नोकरीच्या (job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये फार्मासिस्ट या पदासाठी मोठी भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना 10 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज मुदतीपूर्वी करणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती सोप्या भाषेत.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट या पदासाठी एकूण 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची पात्रता काय आहे जाणून घेऊया. कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा त्याने समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे देखील आवश्यक आहे. उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून डिप्लोमाची डिग्री देखील संपादन केलेली असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेत अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड कशी केली जाणार, हे देखील आपण जाणून घेऊ. बँक शॉर्टलिस्ट केली गेली आहे, अशा उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार बँक शॉर्टलिस्ट लावण्यात येणार आहे. उमेदवारांची सर्व शैक्षणिक पात्रता तपासली जाणार आहे. यामध्ये पदवी, डिप्लोमा यांचा समावेश आहे. सोबतच विविध बँका दवाखान्यापासून किती अंतरावर आहेत, याचा देखील विचार केला जाणार आहे. PSB/PSU/सरकारी संस्था/ RBI यामधील उमेदवारांचा अनुभव याचा देखील विचार करून निवड करण्यात येणार आहे.

मोबदला, कामाची वेळ आणि अटी

फार्मासिस्टांना प्रत्येक तासाला चारशे रुपये प्रमाणे पेमेंट दिले जाणार आहे. दिवसातून पाच तासापेक्षा जास्त वेळ काम नसणार आहे. यासाठी उमेदवारांना प्रती दिवस 2,000 पेक्षा जास्त पेमेंट दिले जाणार नाही. बरोबरच उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे वेतन भत्ते नसणार आहेत. उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरीचे ठिकाण दिले जाणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाइन असून, खालील पत्त्यावर सविस्तर अर्ज भरून उमेदवारांनी पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई. प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई 400001 या पत्त्यावर दहा एप्रिल 2023 पर्यंत फॉर्म पोहोचवणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी करून अर्ज व्यवस्थित भरण्यासाठी तुम्हाला www.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भातील जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Income Tax Bharti 2023: पदवीधर आणि दहावी पास उमेदवारांसाठी आयकर विभागात मोठी भरती; लगेच असा करा अर्ज..

EPFO Recruitment 2023: बारावी आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; या विभागामध्ये 2859 जागांसाठी भरती..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

Samsung Galaxy S20 FE 5G: 75 हजाराचा हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 30 हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.