Shivsena: ‘या’ मुद्द्यांच्या आधारे ठाकरेंना ‘शिवसेना’ आणि ‘चिन्ह’ पुन्हा मिळणार; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या होणार सुनावणी..

0

Shivsena: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवसेना कोणाची या वादावर अखेर निवडणूक आयोगाने पडदा टाकला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील कार्यकर्ते निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्रमक झाल्याचं दिसून आलं. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये काही मुद्दे नमूद करण्यात आली असून, याची उत्तर आता निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे.

बंडखोरी करत शिवसेनेच्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी यावरच न थांबता थेट पक्षावरच दावा ठोकल्याने देशाच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदे यांना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह देत शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे एक प्रकारे स्पष्ट केलं. मात्र निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल चुकीचा असल्याचा अनेक घटना तज्ञांनी म्हटलं. एवढच नाही तर महाराष्ट्रातील जनता देखील या निर्णयाविरोधात संतोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. आता या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्ट केले असून, उद्या या निकालावर सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी देखील आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निकाल देऊ नका. असं म्हणत कॅव्हेट दाखल केली आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या याचिकेसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युक्तिवाद करता येणार आहे. उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्यणाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाच्या विरोधात अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी या याचिकेत मांडले आहेत. हे मुद्दे नेमके काय आहेत? जाणून घेऊया सविस्तर.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात याचिकेत मांडलेले मुद्दे;

१) एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मर्जीने शिवसेना पक्ष सोडला आहे. अशावेळी ते चिन्हावर आणि पक्षावर दावा कसा काय करू शकतात? 

२) केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा पायदळी तुडवत शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय घेतला आहे का? असाही सवाल उपस्थित केला आहे.

३) निवडणूक आयोगाने निकाल देत असताना दोन्ही गटाच्या बहुमताचा विचार केला का?

४) शिवसेना या पक्षात गटबाजी सुरू आहे, याविषयी निवडणूक आयोगाला माहित नाही का?

५) केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह याबाबत घेतलेला निर्णय हा पक्षपाती नाही का?

६) शिवसेना पक्षाच्या संविधानात 2018 साली बदल करण्यात आला होता. तो निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीचा ठरवत आहे?

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच एक पत्रकार परिषद घेऊन, निडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचा असलेला १५० कोटी निधी वापरण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, पक्षनिधीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तसेच शिवसेना शाखा, शिवसेना भवन यावर शिंदे गट दावा करण्याच्या ही चर्चा आहेत. असे झाल्यास आम्ही निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल करू, असा इशाराच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेले याचिकेवर आता उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाने कोणत्या मुद्द्यावर ‘शिवसेना’ हा पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं? याची सर्व डिटेल्स आता निवडणूक आयोगाला कोर्टात सादर करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

 हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Tips For Married Couple: पती पत्नीच्या नात्यात कायम ओलावा ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.