Shiv jayanti: ..म्हणून ‘या’ छोट्याश्या गावात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीची होतेय सर्वत्र चर्चा..
Shiv jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (chatrapati shivaji maharaj jayanti) देशभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. माळशिरस तालुक्यामधील पिंपरी या छोट्याशा गावामध्ये देखील काल ‘शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिवजयंती महोत्सव समिती पिंपरी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त समितीने विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. सोबतच कृषी, आरोग्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पिंपरी मधील नागरिकांना ‘पिंपरी भूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. Video: ग्रामपंचायतीचा अजब कारभार! पाणी असूनही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही; वयोवृद्ध महिलांचा पाण्यासाठी टाहो..
पिंपरी गावाला दुष्काळ हा पाचवीला पुजला आहे. मात्र तरी देखील आत्मविश्वास, जिद्द, मेहनत या जोरावर ‘अरुण कर्चे’ या शेतकऱ्याने आपला मळा फुलवला. पाण्याचा कोणताही स्त्रोत नसताना शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचा साठा निर्माण केला. डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतामध्ये ढोबळी मिरची, टोमॅटो, शेवगा यासारख्या पिकांची यशस्वीरीत्या शेती करत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. सोबतच गावातील शेकडो महिलांना रोजगार देण्याचे काम देखील केलं. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल समितीच्या वतीने पिंपरी गावचा ‘कृषीभूषण’ पुरस्कार देऊन ‘अरुण कर्चे’ यांना गौरवण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ‘शिवजयंती महोत्सव समिती पिंपरी’च्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘परिवर्तन क्रिकेट टीम’ आणि ‘गरुडा क्रिकेट टीम’ यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये गरुडा क्रिकेट संघाने परिवर्तन संघाचा दारुण पराभव करत विजेतेपद पटकावले. तर व्हॉलीबॉल स्पर्धेतचा अंतिम सामना परिवर्तन ग्रुप आणि ‘सागर कर्चे मित्रपरिवार’ या संघामध्ये पार पडला. अटीतटीच्या सामन्यात ‘सागर कर्चे मित्रपरिवार’ या संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये विजेत्या संघाला बक्षीस आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. कुस्तीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटू ‘शिवानी प्रदीप कर्चे’ यांचा पिंपरी भूषण म्हणून गौरव करण्यात आला.
देशसेवा, कृषी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना समितीच्या वतीने पिंपरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करणारे पिंपरी भूषण; अंजली गिरीश बाबा कर्चे (मेजर) माया संजय तुकाराम कर्चे (मेजर) सुधामती नाथा अंबु कर्चे (मेजर) पुनम चांगदेव बापूराव कर्चे (मेजर)
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पिंपरी भूषण: सृष्टी सुनील कर्चे, तेजश्री अरुण कर्चे, प्रिया यादव कर्चे (अंगणवाडी सेविका) बालशिक्षण आणि आदर्श गृहिणी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही पिंपरी भूषण देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळामध्ये आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्योती प्रवीण पोपट वरपे यांचाही ‘पिंपरी भूषण’ म्हणून गौरव करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पिंपरी भूषण: मधुकर गुलाब कर्चे, जयराम तानाजी कर्चे (संचालक मार्केट यार्ड)
पिंपरी गावचे सुपुत्र समाज कल्याण अधिकारी सुनील कर्चे यांची शिवजयंती उत्सवाला प्रमुख उपस्थिती होती. दोन वर्षापासून पिंपरी गावमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. नागरिकांचा प्रतिसाद देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळतोय, ही खूप आनंद आणि समाधान देणारी बाब आहे. मात्र यापूर्वी गावांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत नव्हती, ही देखील मोठी शोकांतिका आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करायला करायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचावे, हा यामागचा उद्देश होता. मात्र अलीकडे शिवजयंतीचे स्वरूप बदलल्याचे पाहायला मिळतं. परंतु ‘शिवजयंती महोत्सव समिती पिंपरी’ महाराजांच्या विचारावर चालते. गावातला प्रत्येक नागरिक कसा समृद्ध होईल, याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष असणार असल्याचे मत ‘सुनिल कर्चे’ यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स..
Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..
Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम