Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

0

Chanakya Niti: चाणक्य नीती यांचे सुखी जीवनाबाबतचे सल्ले ऐकायला कोणाला आवडत नाही. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवतात. जीवनसाथी चांगला भेटला तर प्रचंड सुख आणि नाही भेटला तर आयुष्य उद्धवस्त व्हायला वेळ लागत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी कसं करायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. चला तर मग जाणून घेऊयात आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी सांगितलेल्या तीन गोष्टी.

प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येत असतात. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्या आयुष्यात समस्या नाहीत. काही लोकांच्या आयुष्यात समस्या जास्त असतात, तर काहींच्या आयुष्यात कमी प्रमाणात समस्या असतात. मात्र अशा परिस्थितीत जो व्यक्ती संयमाने काम करतो त्याचं कोणतेही काम बिघडत नाही. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत धीर धरणारी व्यक्ती सहज समस्येवर नियंत्रण ठेवू शकते. त्यामुळे तुमचा जीवनसाथी शोधत असताना धीर धरणारी व्यक्ती निवडण्याचा प्रयत्न करा. कारण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडणार नाही.

शब्द हे धनुष्यबाणातून निघालेल्या बाणासारखे असतात. एकदा सुटले की पुन्हा माघारी येत नाहीत. साहजिकच यामुळे शब्दांची निवड करताना नातेसंबंध खराब होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. एवढंच नाही, तर तुमच्या बोलण्यामुळे खराब झालेले नाते संबंध देखील व्यवस्थित करण्याची ताकद असायला हवी. त्यामुळे जीवनसाथी निवडण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कसं बोलावं? हे माहिती असल्याची खात्री करून घ्या. सोबतच कधी, कुठे आणि किती बोलावं? हे देखील तुमच्या वैवाहिक जोडीदाराला माहिती असणं गरजेचं आहे.

तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न करू नका

कोणत्याही व्यक्तीला जीवनसाथी बनवण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या इच्छा जाणून घ्या. जोडीदाराची निवड करताना त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुम्ही एकमेकांना ओळखू शकाल. एवढच नाही, तर समोरची व्यक्ती कोणत्या दबावाखाली तर लग्न करत नाही? हे देखील कळून येईल. कारण दबावाखाली लग्न केलेल्या वैवाहिक जीवनातमध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. दोघांचीही एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा आणि समर्प मनाची भावना असेल तर लग्नानंतर समस्या उद्भवत नाहीत.

सौंदर्यापेक्षा वैवाहिक जीवनामध्ये बौद्धिक क्षमतेला फार महत्त्व आहे. अनेकांना आपली पत्नी सुंदर असावी, असं वाटत असतं. यात गैर देखील काही नाही. मात्र फक्त सौंदर्य पाहून जर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेत असाल, तर ती खूप मोठी चूक होऊ शकते. सौंदर्याबरोबरच वैवाहिक जोडीदाराची बौद्धिक क्षमता देखील महत्त्वाची असते.

हे देखील वाचा Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..

Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..

Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..

Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..

Relationship Tips: फॅमिली प्लॅनिंग करताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा क्षणात व्हाल उध्वस्त..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.