Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..

0

Prithvi Shaw: भारताचा धडाकेबाज सलामीवीर ‘पृथ्वी शॉ’वर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पृथ्वी आपल्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. काही मेल आणि फिमेल चाहत्यांनी पृथ्वी सोबत फोटो काढले. मात्र या चाहत्यांची वर्तणूक योग्य नसल्याने पृथ्वीने हॉटेल मॅनेजरला बोलवून समज दिली. परंतु असं केल्याने त्यांना राग आला आणि बाहेर आल्यानंतर मोठा राडा झाला. (Prithvi Shaw Video)

मुंबईमधील सांताक्रूझ या ठिकाणी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना ही घटना घडली. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर काही लोकांनी बेसबॉलच्या बॅटने हल्ला केल्याचे सांगण्यात आले असून, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पृथ्वी शॉच्या हातामध्ये बेसबॉल बॅट असल्याचे पाहायला मिळत आहे. ही बॅट एका मुलीने देखील पकडली असल्याचं दिसत आहे.

काय म्हणाला ‘पृथ्वी शॉ’चा मित्र

पृथ्वी शॉ’चा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आमच्यावर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. शिवाय आरोपींनी गाडीचा पाठलाग करून पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची देखील धमकी दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सुरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार सपना गिलसह 8 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात केली आहे.

पृथ्वी शॉ’नेच मारहाण केल्याचा आरोप

सपना गिल (sapna Gill) आणि शोभित ठाकूर (shobit Thakur) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आठ संशयितांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सपना गिल यांच्या वकिलांनी ‘पृथ्वी शॉ’नेच मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर गिलचे वकील म्हणाले, पृथ्वीच्या मित्राने यापूर्वी देखील हल्ला केला होता. सपना गिल सध्या ओशिवरा पोलीस स्थानकामध्ये आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी पोलीस करत आहेत.

का झाला वाद

हा संपूर्ण प्रकार काल बुधवारी घडला असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. काल ‘पृथ्वी शॉ’ आपल्या मित्रांसोबत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. हॉटेलमध्ये सपना गिल आणि तिचे मित्र देखील उपस्थित होते. त्यांनी पृथ्वीला सेल्फी मागितला. दोन जणांसोबत सेल्फी काढला. मात्र सपना गिल यांच्या संपूर्ण ग्रुपसोबत सेल्फी काध्णयची मागणी केली तेव्हा मात्र पृथ्वीचे नकार दिला आणि वाद झाला.

हॉटेलमधून बाहेर पाडल्यानंतर कारवर हल्ला

पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडले. सोबतच सपना गिल आणि तिचा ग्रुप देखील बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर, लगेच बेसबॉलच्या बॅटने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीची काच तोडण्यात आली. असं पृथ्वीच्या मित्रांचे म्हणणे आहे. आम्हाला कोणताही वाद नको होता, म्हणून आम्ही पृथ्वी शॉला दुसऱ्या गाडीत पाठवले. मात्र पुढे पृथ्वीचा देखील पाठलाग करून गाडीची काच तोडण्यात आली. असा आरोप पृथ्वी शॉच्या मित्रांकडून करण्यात आला आहे. गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली. एवढेच नाही, तर हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर खोत्या केसमध्ये अडकवले जाईल, असंही एक महिला म्हटल्याचं आरोप पत्रात पृथ्वीच्या मित्राने म्हटले आहे.

 हे देखील वाचा IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट.

Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..

Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..

Relationship Tips: फॅमिली प्लॅनिंग करताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा क्षणात व्हाल उध्वस्त..

Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.