Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..
Health Tips: आपल्या दिवसाची सुरूवातच साखरेपासून होत असते. त्यामुळे महिनाभर साखर (sugar) खाणार नाही, ही कल्पना डोक्यात येण्याचा काही प्रश्नच नाही. सकाळच्या चहा, कॉफी पासून ते अगदी फळांमधून देखील साखर आपल्या शरीरात जातच असते. शिवाय चॉकलेट्स आणि कोल्ड्रिंक्समध्येही भरपूर प्रमाणात साखर असते. काही प्रमाणात आपल्या शरीरामध्ये साखरेची गरज असते. मात्र, प्रक्रिया केलेल्या साखरेमुळे आपल्या शरीराला अनेक अपाय देखील होतात.
प्रक्रिया केलेली साखर शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करू शकते. सध्याची आपली जीवनशैली पाहता अनेकांना लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार कॉमन झालेले पाहायला मिळतात. मग योगा, योग्य डाएट घेण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करतो. मात्र कितीही कडक डाएट फॉलो केला तरी देखील कोणत्या ना कोणत्या पदार्थातून साखर आपल्या शरीरात जातेच जाते. म्हणूनच साखरयुक्त पदार्थ खाणेच जर आपण वगळले तर काय होईल? साहजिकच याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल. जर तुम्ही महिनाभर साखर खाल्लीच नाही, तर काय होईल? महिनाभर शरीरामध्ये साखर न जाणे प्रचंड आवघड आहे. मात्र जर असं झालं तर तुमच्या आरोग्यावर याचे आश्चर्यकारक फायदे दिसतील. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
साखर कोणतीही असो मग ती प्रक्रिया केलेली असो वा नैसर्गिक. साखरेमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. साखरेतील कॅलरीज आपल्या शरीरातील चरबी वाढण्यास मदत करते. यामुळे आपले वजन झपाट्याने वाढते. परंतू आहारातून साखर काढून घेतली तर, शरीरात कॅलरीजची संख्या नियंत्रित राहून वजनही नियंत्रित राहू शकते. तज्ज्ञांचे असे मत आहे, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी बिघडते, ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.
जर आपण आहारातून साखर काढून टाकली तर ते रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी करण्यास सुरवात करेल. आहारातून साखर काढून टाकल्याने शरीरातील ऊर्जा पातळीही वाढल्याचे आपल्याला जाणवेल. साखरेच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जेव्हा आपण आपल्या आहारातून साखर कमी करतो, तेव्हा आपल्याला अधिक उत्साही असल्याचे जाणवते.
आपण पाहीले आहे की, लहान मुलांनाही प्रक्रिया केलेली साखर देण्यासाठी डॉक्टर मनाई करतात. साखरेचे फायदे कमी अपायच अधिक आढळून येतात. म्हणूनच अनेक न्यूट्रीशनिस्ट सर्वात आधी आहारातून साखर कमी करण्याचा सल्ला देतात. आपल्या आहारातून साखरेचे प्रमाण कमी केल्यास आपला मूड देखील सुधारण्यास मदत होते. कारण यामुळे शरीरात इन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो.
उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयाशी संबंधित आजारांसाठी साखर ही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. त्यामुळे साखर आपल्या आहारातून वजा केली तर आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. साखरेच्या अतिसेवनाने आतड्यात जळजळ होणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि जुलाब सारख्या समस्या उद्भवतात. साखरेच्या सेवनाने होणारे अपाय आपण पाहिले. महिनाभरासाठी जरी साखर आहारातून वजा केली, तर त्याचे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झालेले दिसतील. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये साखर आहे, असे पदार्थ खाणे टाळल्यास याचे अनेक आश्चर्यकारक फायदे झाल्याचे पाहायला मिळतील.
हे देखील वाचा Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..
Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..
Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..
Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम