IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट..
IND vs AUS: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम खेळ दाखवला. त्याचबरोबर एका स्टार खेळाडूने पहिल्या कसोटी सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली आहे. या खेळाडूला संघात स्थान मिळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताची नजर दुसऱ्या सामन्याकडे आहे, मात्र त्याआधी संघातून खेळाडूला वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) दीर्घकाळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला केवळ 20 धावा करता आल्या होत्या. याआधी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो फ्लॉप गेला होता. भारताचा माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलच्या संघात समावेश करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 8 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46 कसोटीनंतर 34 ची सरासरी सामान्य आहे. केएल राहुलच्या जागेवर शुभमन गिलचे स्थान असल्याचे प्रसाद यांनी म्हंटले आहे.
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुलला संघातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. हरभजनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना केएल राहुलला संघातून वगळले पाहिजे, असे म्हटले आहे. हरभजनसिंगने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने म्हंटले आहे की, ‘राहुलला संघाबाहेर केल्यास भारत ऑस्ट्रेलियाला 4-0च्या फरकामने मालिका जिंकेल.
काय म्हणाले विक्रम राठोड
एकीकडे केएल राहुल वर सर्व स्तरातून टीका होत असली तरी दुसरीकडे मात्र भारताचा फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत राहूलची पाठराखण केली आहे. विक्रम राठोड म्हणाले,केएल राहुलने आफ्रिकेमध्ये शतक झळकावले आहे. त्याच्याकडे नक्कीच क्षमता आहे. पण तो अलीकडेच फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा काढणे हे एक मोठे आव्हान असते, त्याच्या क्षमतेच्या जोरावर त्याला आणखी एक संधी मिळायला हवी.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. तो केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी देऊ शकतो. गिलने न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांनाच वेड लावले आहे. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. शुभमन गिलने भारतासाठी 13 कसोटी सामन्यात 736 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे सलामीचा अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारत मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. या मालकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यांत विजय मिळवणे भारतासाठी अनेक अंगांनी महत्तवाचे ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा काय रणनिती आखणार हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा Chetan Sharma: विराट कोहली खोटारडा, हे खेळाडू घेतात तसले इंजेक्शन; चेतन शर्माच्या विधानाने BCCI मध्ये भूकंप, पाहा व्हिडिओ..
Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..
Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम