Aditya Thackeray: रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेंना 44 फोन केले? वस्तुस्थिति जाणून तुम्हीही ‘या’ लोकांना घालाल शिव्या..
Aditya Thackeray: महाराष्ट्र विधानसभेचे (maharashtra Vidhan sabha) हिवाळी अधिवेशन (Winter session) नागपूरमध्ये (nagpur) सुरू असताना, आता पुन्हा एकदा दिशा सालियन (disha salian) प्रकरण सत्ताधाऱ्यांकडून उकरून काढण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणी (nagpur land scam) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव समोर आल्यानंतर, विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
याला काउंटर अटॅक म्हणून, सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) काढलं असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. प्रथम लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 44 फोन कॉल केल्याचा आरोप केला. परंतु खरंच आदित्य ठाकरे यांनी रिया चक्रवर्तीला 44 फोन केले?
अभिनेता सुशांत सिंग राजपूत (shushant singh rajput case) प्रकरणात सीबीआयच्या (CBI) अहवालामध्ये सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली असल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र आता या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केल्याने पुन्हा एकदा सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण चर्चेत आले आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये विरोधकांनी आदित्य ठाकरे यांचा देखील हात असल्याचा आरोप यापूर्वी देखील केला होता. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जातं आहे.
सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येपूर्वी सुशांतची मॅनेजर दिशा सालियन (disha salian) हिचा सहा दिवसा अगोदर मृत्यू झाला. दिशा सालियन हिचा मृत्यू १४ व्या मजल्यावरून पडून झाला. दिशा नशेत असल्याने पाय घसरून तिचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल सीबीआयने सादर केला. मात्र तरी देखील राणे पिता पुत्रांनी पत्रकार परिषदा घेत वारंवार दिशाच्या मृत्यूचा संबंध आदित्य ठाकरे सोबत जोडत वेळोवेळी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
आता पुन्हा एकदा आपले कारनामे आणि पोळी भाजण्यासाठी सत्ताधारी हे प्रकरण उकरून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला आहे. काल लोकसभेमध्ये राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांच्या अहवालामध्ये रिया चक्रवर्तीला ‘AU’ या नावाने सेव्ह असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरचे 44 फोन कॉल गेले. बिहार पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामध्ये ‘AU’ म्हणजे आदित्य उद्धव हा व्यक्ती असल्याचं बिहार पोलिसांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.
खासदार राहुल शेवाळे ‘AU’ हा व्यक्ती आदित्य उद्धव आहे का? याची देखील सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. मात्र या संदर्भात रिया चक्रवर्तीने सीबीआय आणि मीडियाला दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ‘AU’ म्हणजे आदित्य उद्धव नाही, तर माझी मैत्रीण ‘अनाया उदास’ (anaya udas) असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील सत्ताधारी आपल्यावरचे आरोप लपविण्यासाठी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन हे प्रकरण उकरून काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. असा आरोप विरोधकांनी देखील केला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी सीमा प्रश्न यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी बीजेपीने आखलेला हा डाव असल्याचं, आता जवळपास स्पष्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असा आरोप देखील आता विरोधकांबरोबर जनता देखील करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सीबीआयने दिलेला अहवाल, रिया चक्रवर्तीने या संदर्भात दिलेले स्पष्टीकरण, त्याचबरोबर दिशाच्या आई-वडिलांनी घेतलेली भूमिका, यावरून दिशाच्या मृत्यूशी कोणाचाही संबंध नसल्याचं स्पष्ट होत आहे.
धादांत खोटं बोलून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम ईडी सरकार करत आहे.
भूखंड घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरण, महापुरुषांचा अपमान या विषयांपासून पळ काढण्यासाठी उगाच वादळ उठवलं जातंय! pic.twitter.com/yCTl9ivzmK— Nana Patole (@NANA_PATOLE) December 22, 2022
त्यामुळे राजकारणासाठी हे प्रकरण उकरून काढलं जात असल्याचं बोललं जात आहे. साहजिकच यामुळे जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचं स्पष्ट होत असून, सत्ताधाऱ्यांचा देखील हाच डाव असल्याचा विरोधक आरोप करत आहे.
हे देखील वाचा healthy lifestyle Tips: हिवाळ्यात हे चार पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन..
Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..
FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम