Crocodile and Child: तो नदीत बुडत होता, पाठीमागे मगर लागली होती, पण त्याने हिंमत सोडली नाही; तुम्हीच पाहा हा थरारक व्हिडिओ..
Crocodile and Child मगर (Crocodile) किती हिंस्र प्राणी आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. सिंह, (lion) वाघ (tiger) यासारख्या हिंस्र प्राण्याचे शिकार देखील मगरीने केल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. एवढेच नाही, तर माणसाची देखील शिकार मगरीने अनेकदा केली आहे. सोशल मीडियावर (social media) प्राण्याचे व्हिडिओ (video) तुफान व्हायरल Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (video social media) तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत नदीत एक चिमुकला बुडत आहे. हे संकट कमी की काय म्हणून त्याच्या पाठीमागे मगर लागली. मात्र तरीदेखील चिमुकल्याने हिंमत सोडली नाही. आणि अखेर त्याला स्वतःला वाचवण्यात यश आले. होय तुम्ही बरोबरच वाचलंय.
एखाद्या चित्रपटाला देखील लाजवेल असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. चित्रपटातले दृश्य पाहून आपण अनेकदा थक्क होऊन जातो. मात्र हा व्हिडिओ प्रत्यक्षात पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांची काय अवस्था होईल, याची कल्पना देखील करवत नाही. तुमची ताकद कितीही लहान असली, तरी तुमची हिंमत तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. हेच या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. एक चिमुकला नदीत बुडत आहे, हे संकट कमी की काय म्हणून, त्याच्या पाठी मगर लागली आहे. पुढच्या काही मिनिटांत आपल्याला हे जग सोडून जाऊ लागणार आहे, याची पूर्ण कल्पना चिमुकलेला असून देखील, त्याने हिंमत सोडली नाही. मात्र तरीदेखील चिमुकल्याने या दोन्हीं संकटांवर मात केली. काय घडलं नेमकं? जाणून घेऊया सविस्तर
काय घडलं नेमकं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ IRS अधिकारी @DrBhageerathIRS यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ करताना त्यांनी हीच खरी वीरता असल्याचे भन्नाट कॅप्शनही दिले आहे. या व्हिडिओत एक चिमुकला नदीच्या लाटांमध्ये गटकाळ्या खाताना दिसत आहे. नदीत येणाऱ्या जोरदार लाटांचा एकीकडे हा चिमुकला सामना करत असतानाच, त्याच्या पाठीमागे मगर लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या दुहेरी संकटात आता आपलं काही खरं नाही, याची पूर्ण जाणीव असून देखील या बहादराने हिंमत हारत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहताना चिमुकला मोठ्या हिमतीनं आपल्यावर आलेल्या संकटांचा सामना करताना पाहायला मिळत आहे. हे सगळं खर असलं तरी मात्र या मोठ्या संकटातून स्वतःला तो कसा वाचवेल? किती वेळ या संकटांचा सामना करेन? या प्रश्नाचा विचार करून व्हिडिओ पाहणारा देखील हार मानेल. एकंदरीत असं हे चित्र आहे. हा चिमुकला जोरजोरात हेल्प हेल्प म्हणून ओरडत आहे.
नदीच्या मोठमोठ्या लाटा आणि पाठीमागे लागणारी मगर या दोन्हीं संकटांचा सामना मोठ्या हिंमतीने करत असताना त्या ठिकाणी चिमुकल्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम येते. अनेकदा आपण पाहतो, एकच वेळी एवढी संकटे आल्यानंतर आपण सगळी आशा सोडून देतो. मात्र हा चिमुकला हिंमतीने या संकटाला सामोरा गेला. रेस्क्यू टीम त्याच्यापाशी पोहचल्यानंतर, त्याने लगेच आपला हात वर केला आणि रेस्क्यू टीमने त्याला वर खेचले. अखेर तो या दोन्हीं बलाढ्य संकटातून बाहेर पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं प्रचंड कौतुक होत आहे.
This is real heroic deed. Chambal river, crocodiles and the fighter kid. Salute to the rescue team. #Chambal pic.twitter.com/MvNVLV5pVy
— Dr Bhageerath Choudhary IRS (@DrBhageerathIRS) August 24, 2022
काय म्हणाले नेटकरी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत चार लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही युजर्सने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, मुलाच्या धैर्याला खरोखरच सलाम ठोकला पाहिजे. इतकं जबरदस्त संकट समोर असताना देखील या मुलाने धिर सोडला नाही. आणि आलेल्या संकटांचा सामना केला. दुसऱ्या एका युजर्सने म्हंटले आहे, मुलाबरोबर बचाव पथकाला देखील सलाम केला पाहिजे. अगदी योग्य वेळी मुलाला वर खेचले, आणि त्याचा जीव वाचवला. तर दुसऱ्या एका युजर्स म्हंटले आहे, हे दृश्य चित्रपटापेक्षाही थरारक आहे.
हे देखील वाचा Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..
Mongoose and snake: इवलेसे मुंगूस सापवर पडले भारी; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.