Lifestyle: या ‘आठ’ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

0

Lifestyle: प्रत्येकाला आपले कुटुंब हे समाधानी आणि आनंदी असावं, असं वाटतं असतं. मात्र प्रत्येकाचे कुटुंब आनंदी आणि समाधानी असेलच असं नाही. अनेकांच्या कुटुंबात अनेक अडचणी असतात. घरात नेहमी भांडणे वाद-विवाद होतात. अनेकदा घरात आर्थिक समस्या नसून, देखील घरातील अनेक सदस्य एकमेकांचा तिरस्कार करू लागतात. याचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. हे नक्की कशामुळे होतं? याविषयी अनेकांना माहीत नसते. मात्र असे प्रकार घडण्यापाठीमागे वास्तूशास्त्राचा देखील मोठा हात असतो. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

कुटुंबातील सदस्यांमध्ये जर नकारात्मकता येत असेल, तर या पाठीमागे वास्तुशास्त्र आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र वास्तुशास्त्रात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तुमच्या घरात कोण-कोणत्या वस्तू असतात, यावरून घरातील वातावरण आणि घरातील सदस्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. तुमच्या घरातील काही वस्तूंमुळे तुमच्या कुटुंबात असणाऱ्या आनंदी वातावरणात बाधा निर्माण होऊ शकते. अशा कोणत्या वस्तू आहेत? आज आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांना यावर विश्वास नसतो, अनेकजण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात. महाराष्ट्र लोकशाही देखील आपल्या कर्मावरच विश्वास ठेवते. मात्र वास्तूशास्त्रानुसार आयुष्य जगणारा देखील मोठा वर्ग पाहायला मिळतो. असो, प्रत्येकाचे आयुष्य जगण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया.

निगेटिव्ह एनर्जी 

घरातील वातावरण हे नेहमी पॉझिटिव्ह असणं आवश्यक असतं. घरामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असतील, तर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये नेहमी नकारात्मकता निर्माण होत राहते. आणि कोणतेही काम करण्यासाठी उत्साहाची कमतरता भासते. घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल, तर अनेकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवतो. आणि यामुळे चिडचिड देखील होत राहते. पॉझिटिव्ह माणसे नेहमी आशावादी असतात. हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून निगेटिव्ह एनर्जी घरातील सदस्यांमध्ये पाहायला मिळत असेल, तर आपण याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.

युद्धाचे फोटो 

घरामध्ये कोणकोणत्या वस्तू लावल्या जाव्या, याविषयी देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही घरामध्ये युद्धाचे फोटो लावले असतील, तर हे तुमच्यासाठी योग्य नाही. अनेकांना महाभारत, रामायण मधील युध्दाचे फोटो लावण्याची सवय असते. मात्र यामुळे तुमच्या घरामधील आनंदी वातावरणात बाधा देखील येण्याची शक्यता असते. युद्धाच्या फोटोकडे पाहील्यास घरातील सदस्यांना हे फोटो भांडण्यासाठी प्रोत्साहित करतात, असं वास्तुशास्त्र नमूद करण्यात आलं आहे.

काटेरी झाडे

घराच्या अवतीभवती तसेच घरामध्ये देखील अनेकांना झाडे झुडपे लावण्याची सवय असते. काही झाडांमुळे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण देखील निर्माण होते. मात्र अशी अनेक झाडे आहेत, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडण्याची देखील शक्यता असते. त्यापैकीच ‘कॅक्टस’ हे एक झाड आहे. अनेकांना हे झाड घरात ठेवण्याची सवय असते. मात्र यामुळे तुमच्या आनंदी वातावरणात बाधा येऊ शकते. या झाडाला काटे असल्यामुळे, घरातील सदस्यांच्या आयुष्यात देखील काटे येतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या झाडामुळे घरातील सदस्यांचा स्वभाव रागीट आणि द्वेष निर्माण करणारा होता.

निगेटिव्ह फोटो

घरामध्ये फोटो लावण्याची अनेकांना सवय असते. हे करत असताना आपण अनेकदा घरामध्ये निगेटिव्ह फोटो देखील लावण्याचे काम करत असतो. उदाहरण द्यायचं झालं, तर तलवारबाजी करणारा एखादा योद्धा, हत्तीच्या पायात साखळी असणारा फोटो, बुडणारे जहाज, रडणारे किंवा दुःखी असणाऱ्या मनुष्यांचे फोटो अशा फोटोमुळे घरामध्ये नेहमी नकारात्मकता निर्माण होते. हे फोटो आपल्याला दिसायला चांगले वाटत असले, तरी यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे असे फोटो घरात लावणं टाळावं.

हिंस्र प्राण्यांचे फोटो

घरामध्ये नेहमी विविध प्राण्यांचे फोटो लावले जातात. यामध्ये नकळत आपल्याकडून हिंस्र प्राण्यांचे फोटो देखील लागले जातात. अनेकांना सिंहाचे, वाघाचे फोटो लावण्याची सवय असते. मात्र हे हिंस्र प्राणी आहेत. या हिंस प्राण्यांचे फोटो आपण घरांमध्ये लावल्यास घरातील सदस्यांचे वर्तन देखील आक्रमक होते. माणसाचे वर्तन हे आक्रमक असणे चुकीचे नाही, मात्र कोणत्या कारणांसाठी आपण आक्रमक होतो, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून घरामध्ये अशा हिंस्र प्राण्यांचे फोटो लावणं टाळणे आवश्यक असल्याचं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

तुडलेला आरसा

घरात काही तुटलेल्या वस्तू देखील असतात, आपण त्या वापरतो. त्यात काही गैर नाही. मात्र कधीकधी घरामध्ये असणारा आरसा किंवा एखादी काच तुटलेली असेल, तर ती घरात ठेवणं योग्य नसल्याचं, वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरामध्ये तुटलेला आरसा हा कधीही वापरू नये. जर आपण तुटलेला आरसा वापरला तर, आपल्या दिवसाची सुरुवातच खराब होत असल्याचं सांगण्यात आले आहे.

नटराज

घरामध्ये आपण नटराजचा फोटो किंवा मूर्ती वापरतो. नटराज हे शिवाचे रूप मानले जाते. साहजिकच यामुळे अनेकजण घरामध्ये नटराज ठेवतात. नटराज हे शिवाचे रूप असले, तरी ते कला आणि विनाश या दोन्हींचे प्रतीक मानले जाते. आता आपण या दोन्ही प्रतिकांपैकी कला किंवा विनाश हे दोन्हीं या नटराजमध्ये पाहत असल्यास, घरातील वातावरण बिघडण्यास सुरुवात होते. असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. टीप– ही माहिती प्राथमिक माहितीच्या आधारावर दिलेली आहे. महाराष्ट्र लोकशाही याची खात्री देत नाही.

हे देखील वाचा WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा

Lifestyle: यातीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.