Jio prepaid plan: Jio चा ‘हा ‘प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..
Jio prepaid plan: जियो आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल करताना दिसून येते. Airtel, Idea सारख्या अनेक नामांकित कंपन्यांची ग्राहक संख्या कमी होण्यापाठीमागे जियोचा खूप मोठा हात आहे. सुरुवातीच्या काळात jio ने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा ग्राहकांना तब्बल एक वर्ष incoming outgoing, तसेच अनलिमिटेड internet सेवा दिली. साहजिक यामुळे अनेक टेलिकॉम कंपनीचे ग्राहक जियोकडे वळाले. जियोने देखील हळूहळू आपला प्लॅन महाग केला. मात्र तरी देखील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत Jio आपल्या ग्राहकांना आणखी स्वस्त प्लॅन परचेस करताना दिसून येते. आता पुन्हा एकदा jio ने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन उतरवला आहे.
जर तुम्ही देखील जिओचे ग्राहक असाल, आणि तुम्हाला दोनशे रुपयांनी स्वस्त प्लॅन अपडेट करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला Jio 666 प्रीपेड प्लॅन विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमचे तब्बल २०० रुपये वाचणार आहेत. Jio चा 666 प्रीपेड प्लॅन हा jio चा सर्वाधिक विकला गेलेला प्लॅन आहे. या मागचे कारण देखील खास आहे, ग्राहकांना या प्रीपेड प्लॅन पाठीमागे तब्बल दोनशे रुपये वाचवता येत आहेत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ग्राहक परचेस करत आहेत. तुम्हाला देखील या प्लॅन पाठीमागे दोनशे रुपये वाचवायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
सर्वप्रथम आपण या प्लॅन विषयी सविस्तर जाणून घेऊया. 84 दिवसंची वैधता असणारा हा प्रीपेड प्लॅन 666 रुपयांचा आहे. या प्रीपेड प्लॅनच्या benefits विषयी जाणून घ्यायचे झाल्यास या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १:५ gb डाटा प्रदान करण्यात येतो. त्याचबरोबर दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय तुम्हाला 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, यात नवीन काय आहे, हा प्लॅन आम्हाला माहितच आहे. होय तुम्हाला असं वाटणे स्वभाविक आहे. मात्र हा प्लान रिचार्ज केला, तर तुम्हाला तब्बल २०० रुपयांची सूट देखील मिसळणार आहे. कसं ते देखील आपण समजून घेऊया.
६६६ रुपयांचा प्लॅन तुम्हाला केवळ ४६६ रुपयांना पडू शकतो. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Amazon Pay या पेमेंट ॲपवरून रिचार्ज करावा लागेल. होय, तुम्ही बरोबरच वाचलं आहे. जर तुम्हाला या प्लॅनमध्ये २०० रुपयांची सूट हवी असेल, तर तुम्ही Amazon Pay या पेमेंट ॲपवरून रिचार्ज करणं आवश्यक आहे. हे UPI पेमेंट ॲप तुम्हाला या रिचार्ज पाठीमगे तब्बल २०० रुपये सूट देत आहे. जर तुम्ही या UPI पेमेंट ॲपच्या माध्यमातून पहिल्यांदाच रिचार्ज करत असाल, तर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय आणखी एक ऑफर तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही my jio या ॲपच्या माध्यमातून रिचार्ज केला, तर तुम्हाला २५ रुपये सूट मिळू शकते. तसं पाहायला गेलं तर याला आपण सूट नाही म्हणू शकत. ही रक्कम तुम्हाला cashback च्या माध्यमातून दिली जाते. यात एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदाच रिचार्ज करत असाल, तरच ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला airtel चा ६६६ रुपयांचा प्रिपेड प्लॅन देखील अनेक भन्नाट ऑफर प्रदान करत आहे. याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
एअरटेल देखील आपल्या 666 प्लॅनमध्ये अनेक वैशिष्ट्ये प्रदान करत आहे. यामध्ये तुम्हाला ७७ दिवसांची वैधता मिळते. मात्र या प्लॅनमध्ये तुम्हाला 77 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन सबस्क्रिप्शन देखील मिळत असल्याने, हा प्लॅन चांगलाच चर्चेत आहे. याबरोबरच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB gb डाटा मिळत आहे. सोबतच 77 दिवसांकरिता दररोज १०० एसएमएस देखील कंपनी देत आहे. जर तुम्हाला वेबसिरीज, मूव्ही पाहायची आवड असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी खास ठरू शकतो. कारण मोबाइल एडिशन सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागत नाहीत.
हे देखील वाचा Marriage tips: या पाच गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात या गोष्टी..
Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..
MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..
Shravan 2022: श्रावणात या पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.