Marriage tips: या ‘पाच’ गोष्टींतून महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात ‘या’ गोष्टी..

0

Marriage tips: नवरा बायकोच नातं खूपच विश्वासाचं आणि प्रेमाचं असायला हवं, कारण या दोघांचे जीवन एकमेकांवर अवलंबून असते. दोघे एकमेकांना आधार देत असतील, एकमेकांना समजून घेत असतील, तरच नात्यात गोडवा पाहायला मिळतो. आणि संसाराचा गाडा सुसाट सुटतो. आपला संसारात सुख, समाधान ऐश्वर्य असावं, असं प्रत्येकालाच वाटत असते. लग्नानंतर स्त्री आपले आईवडील, मित्र, मैत्रीणी, सर्व काही सोडून एका अनोळखी घरात अनोळखी माणसांसोबत नवीन आयुष्य सुरु करत असते. मात्र अनेकजण या गोष्टी विसरून जातात. आनंदी आणि सुखी संसार करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी कधीच विसरून चकत नाही, आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

घरातली स्त्री सुखी असेल, तर कुटुंब देखील सुखी असतं असं नेहमी बोललं जातं. तसं पाहायला गेलं तर पुरुषाच्या तुलनेत महिलांचा आयुष्य खूप आव्हानात्मक असतं. अलीकडच्या काळात महिला सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी देखील समाजात वावरत असताना महिलांना काही मर्यादा पडतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अनेकदा स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करून देखील महिलांना पुरुष प्रधान संस्कृतीचा सामना करावाच लागतो. वडिलांच्या घरी मुलीला जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढा निश्चितच लग्न झाल्यानंतर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आपण या गोष्टीचा विचार करून महिलांच्या भावनांचा देखील आदर करणे आवश्यक आहे. तरच वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी होईल. वैवाहिक जीवनात पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी, पुरुषांनी कोणत्या पाच गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

तुमच्या निर्णयात स्त्रीला सामावून घ्या: सासरची संपत्ती तिच्या नवऱ्याच्या नावावर असते. पुढे जाऊन ती संपत्ती तिच्या मुलाच्या नावावर होते. पण यामध्ये मग ती दोन्हीकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ कुटुंबाची सेवा करत असते. मग एखाद्या स्त्रीला काय हवे असते? स्त्रीचा सगळ्यात मोठा आधार तिचा नवरा असतो. नवऱ्याला ती प्रत्येक गोष्ट हक्काने मागू शकते, बोलू शकते. बऱ्याच स्त्रिया तक्रार करतात की, नवरा जो काही निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाला शक्यतो आमचा काहीही विरोध नसतो. परंतु मला विचारत घेतले जात नाही. अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते. ती कुटुंबासाठी एवढी धडपड करत असते.

साहजिकच पुरुषांना आपण घेत असलेल्या कुठल्याही निर्णयात महिलांना सामावून घ्यायला काय हरकत आहे? जी तुमची अर्धांगिनी म्हणून तिचे सगळे सोडून तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी झटत असते. देशाच्या राष्ट्रपिता म्हणून महिलांनी काम केलेलं आहे, देशाच्या, राज्याच्या मंत्रिमंडळात महिला काम करत असतात. मग त्यांना तुमच्या कुटुंबात त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत हक्क का मिळू नये?

पत्नीला गृहीत धरू नका: बरेच पुरुष मंडळी आपल्या पत्नीला गृहीत धरत असतात. आपल्याला जे वाटते, ते आपल्या पत्नीला मान्यच असायला हवे, असे बऱ्याच पुरुष मंडळींना वाटत असते. परंतु या मध्ये तिच्या मनाचा विचार देखील व्हायला हवा. आपली संस्कृती जरी पुरुषप्रधान असली तरीदेखील महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतात. त्यामुळे तिचे योगदान समाजात खूप मोठे आहे. तिला देखील तिचे अधिकार आहेत. कायद्याने स्त्रीला अधिकार दिलेले आहेत. तिला जे योग्य वाटेल, तो निर्णय ती घेऊ शकते. परंतु बऱ्याच स्त्रिया विनाकारण काहीतरी बोलून वाद वाढवत असतात. ते देखील चुकीचेच आहे. महिलांनी हेदेखील टाळायला हवे.

से क्स करताना घ्यायची काळजी: सेक्स हा प्रत्येक स्त्री-पुरुषच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो. बऱ्याच स्त्री-पुरुषांच्या आयुष्यामध्ये सेक्स समस्या असतात. बऱ्याचदा पुरुषांची जेव्हा सेक्स करण्याची इच्छा होते, त्यावेळी पुरुषाने आपली पत्नी सेक्ससाठी तयार आहे का? याचा देखील विचार करायला हवा. बऱ्याचदा याबाबतीत ‘स्त्री’ला गृहीत धरले जाते. रोजच्या दैनंदिन कामामुळे तिची कधी-कधी इच्छा नसून, देखील तीला यासाठी तयार व्हावं लागतं. प्रत्येक स्त्रीला तिच्या भावना जपण्याचा अधिकार आहे. इच्छा नसेल, तर ती सेक्स करण्याला नकार देखील देऊ शकते.

बऱ्याचदा स्त्रिया आपल्या इच्छेविरुद्ध देखील या गोष्टींकडे कानाडोळा करत असतात. परंतु तुमच्या पत्नीच्या मनात तुमच्याबद्दल साहजिकच आदर कमी होईल. आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यावेळी स्त्री आणि पुरुष दोघेही सेक्स साठी तयार असतात, त्यावेळी तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. परंतु पत्नीची इच्छा नसताना देखील, तुम्ही तुमचे म्हणणे पुढे करत असाल, तर साहजिकच तुमची प्रतिमा तुमच्या पत्नीच्या मनात मलीन होईल. त्यामुळे आयुष्य सुंदर बनवण्यासाठी, तुमच्या पत्नीच्या इच्छेचा देखील तुम्ही आदर केला पाहिजे. जर तिच्या इच्छेचा आदर तुम्ही केलात, तर पत्नी आणि तुमच्या नात्यामध्ये अधिकाधिक गोडवा वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल.

पत्नीवर जोरात ओरडू नका, चिडू नका: बऱ्याचदा काही पुरुषांना छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या पत्नीवर जोरात ओरडण्याची सवय असते. तिने काही छोटीशी चूक केली असेल, तर तिला लगेच त्यासाठी जोरात बोलले जाते, तिच्यावर तुम्ही चिडता; परंतु यामुळे तिचे अंतकरण दुखावले जाते. खरंच काही गंभीर चूक असेल, अशावेळी तुम्ही ओरडले तर ती समजून घेईल. परंतु वारंवार जर तुम्ही अशा प्रकारची वागणूक तिला देत असाल, तर लवकरच तुमच्या नात्यामध्ये कटुता येईल. जर तुम्ही कुटुंबातील सर्वांसमोर तिला अशी वागणूक देत असाल तर ती अजूनच दुखावली जाईल. त्यामुळे तुम्ही दोघे असताना तुमच्या चुकांवर बोलला तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

पत्नीची स्तुती करा: कुठलीही स्त्री आपल्या कुटुंबासाठी झटत असते. मुलांसाठी रात्रीचा दिवस करत असते. प्रत्येक ठिकाणी एकच परिस्थिती असते असे नसते. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, परंतु स्त्री कुटुंबासाठी झोकून देत असते. आपल्या नवऱ्याने सांगितलेली कामे, सासू सासर्‍यांची सेवा, तुमची पत्नी उत्तमपणे करत असते. अशावेळी सासू-सासर्‍यांनी तिची स्तुती केल्याने तिला अधिक आनंद होतो. ती थकली असेल तरीदेखील, तिला गोड शब्दांमुळे ऊर्जा मिळते. बऱ्याचदा सासू सासरे आणि काही नातेवाईक बोलत असतात की, ती काही उपकार करत नाही; तिचे ते कर्तव्य आहे. यामुळे मग मनावर परिणाम होतो. एक पती म्हणून तुमच्या पत्नीच्या चांगल्या कामाची, स्वयंपाक घरात तुम्ही स्तुती करू शकता. यामुळे तुम्ही तिचे मन जिंकत असता.

 हे देखील वाचाMarriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Vastushastra: आरसा लावण्याचे ‘हेआहे योग्य ठिकाण; चुकूनही लावू नका या ठिकाणी आरसा अन्यथा होईल सत्यानाश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.