PM kisan: शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता जमा होणार, लवकर करा ‘हे’ काम..
PM Kisan: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने देशातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थती सुधारण्याच्या उद्देशाने अनेक योजना शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना आर्थिक मदत होत आहे. तसेच या योजनेमुळे शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल मिळत आहे. त्यामुळे ही योजना गरीब शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची वाटते.
पंतप्रधान किसान (PM Kisan) योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक चार महिन्यांनी योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आत्तापर्यंत १० हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. ११ व्या हफ्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पहात आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हफ्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला आहे. योजनेचा ११ वा हफ्ता १५ मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा होत आहे. परंतु शासनाने कुठेही अधिकृतपणे याबाबत जाहीर केले नाही.
एकाच कुटुंबातील किती लोकांना घेता येईल PM Kisan योजनेचा लाभ?
पीएम किसान योजनेसाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो का? जर लाभार्थ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर तो एक प्रकारे गुन्हा आहे. पीएम किसान योजनेचे पैसे कुटुंबातील फक्त एका सदस्याला मिळू शकतात. कुटुंबातील दुसऱ्या सदस्याने योजनेचा आर्थिक फायदा घेतल्यास त्याच्यावर कारवाई करून पैसेही वसूल केले जातात.
ई केवायसी कशी कराल?
ई केवायसी करणं खूप सोपं आहे. ज्या शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत असेल तर ते शेतकरी अगदी घरच्या घरी देखील ई केवायसी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउजर मध्ये जावून पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. अर्थात https://pmkisan.gov.in/ वर जा.
‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत असलेल्या ई-केवायसी टॅबवर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तिथे आधार क्रमांकाची माहिती देऊन सर्च टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. त्या ठिकाणी आलेला OTP टाईप करून ‘Submit OTP’ वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा. यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार पडेल.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक: तासंतास मोबाईल वापरत बसल्याने होतायत हे गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा नाहीतर.
MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; असा करा ऑनलाइन अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम