Dinesh Karthik: तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली.,” वाचा ही कहाणी..

0

Dinesh Karthik: प्रेम करणं हा गुन्हा नाही. प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे, हे खर आहे. मात्र प्रेम कोणावर करायचं, याला देखील मर्यादा आहेत. आपल्या जिवलग मित्राच्या पत्नी सोबतच जर तुमचं अफेर असेल, तर याला प्रेम याला प्रेम म्हणता येणार नाही. मुळात आपल्या दोघांचं फ्युचर असू शकतं, हा विचार डोक्यात येणं हाच मूर्खपणा आहे. मात्र हा मूर्खपणा मुरली विजय आणि दिनेश कार्तिकचा पत्नीने केला होता हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.

भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि कसोटी संघाचा सलामीवीर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मुरली विजय दोघे तमिळनाडू संघाकडून एकत्रच घरेलू क्रिकेट खेळत असत. दोघांची कमालीची जिवलग मैत्री होती. दिनेश कार्तिक तामिळनाडू रणजी संघाचा कर्णधार होता. तर मुरली विजय त्याच्या मार्गदर्शनाखाली तमिळनाडू सांघात फलंदाजी करायचा. मुरली विजय अविवाहित होता तर तिनेच कार्तिक विवाहित होता. या दरम्यान एकत्र क्रिकेट खेळताना मुरली विजय आणि दिनेश कार्तिकची पत्नी निकिताशी वाढली आणि हे दोघेही एकमेकांवर प्रेम करु लागले. मात्र आपल्या पत्नीसोबत मुरली विजयचे अफेर आहे, याची जराही कल्पना दिनेश कार्तिकला नव्हती.

एक दिवस अचानक दिनेश कार्तिक ची पत्नी निकिताने राजा पोटात जे मुल आहे ते तुझा मित्र मुरली विजयच असल्याचं सांगितलं. यापूर्वी या दोघांचा ऑफिस सुरू आहे याची यत्किंचितही कल्पना कार्तिकला होती तुम्ही विचार करू शकता हे वाक्य दिनेश कार्तिकचा कानावर पडल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल. पायाखालची वाळू काय असतं हे त्या दिवशी दिनेश कार्तिकने प्रत्यक्षात अनुभवलं. मात्र आता त्याच्या हातात काहीही राहिले नव्हते. निकिताने घटस्फोट मागितला. पुढे निकिताने मुरली विजयशी लग्न देखील केलं.

या घटनेने दिनेश कार्तिक मात्र पूर्णतः तुटला होता. या घटनेचा त्याच्या खेळावर परिणाम होऊ लागला परिणामी त्याला तमिळनाडू संघाच्या कर्णधार पदावरूनही काढून टाकण्यात आलं. दुसरीकडे मुरली विजयचं करियर बहरत होतं. आणि दिनेश कार्तिक पुन्हा आयुष्यात उभा राहिल याची कसलीही गॅरंटी नव्हती. दिनेश कार्तिकने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. मात्र एके दिवशी त्याचा ट्रेनर त्याला जीममध्ये घेऊन गेला. या जिम मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दीपिका पल्लिकल देखील येत असे. दिनेश कार्तिकची अवस्था पाहून तिने दिनेश कार्तिक ला यातून बाहेर काढण्यास मदत केली. पुढे या दोघांनी लग्नही केलं.

जवळपास संपुष्टात आलेल्या करियरने पुन्हा उभारी घेतली आणि दिनेश कार्तिकने भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान देखील मिळवलं. निदास ट्रॉफी चा फायनल मध्ये भारताचा जवळपास पराभव झाला असताना दिनेश कार्तिकने केलेल्या तुफान फलंदाजी आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लगावलेला षटकार लोकं आजही पुन्हा पुन्हा पाहतात. पुढे दिनेश कार्तिक कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा कर्णधारही झाला. आता रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा फिनिशियार म्हणून उत्कृष्टरित्या भूमिका बजावतोय. याचसंदर्भातली रंजक स्टोरी yogesh wagaj याने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

Adani Wilmar Upper Circuit: Adani Wilmar चा शेयर दोन महिन्यांत वाढला तिप्पट; आता गुंतवणूक करायची की नाही? जाणून घ्या सविस्तर..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.