या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड
काल एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी महाविकस आघाडी सरकारला ऑफर दिली, आणि राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील व्हायला तयार असल्याचं खासदार इम्तियाज जलील म्हणाल्यानंतर, काल दिवसभर ठाकरे सरकारवर खासकरून शिवसेनेवर (sivsena) देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी जोरदार बॅटिंग केली. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच हा सुनियोजित कट रचण्यात आला होता, हे उघड झाल्याने आता एकच खळबळ माजली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यात प्रयत्न विरोधी पक्षांकडून सुरू असल्याचं बोललं जातं. जिथे तिथे संधी मिळेल, त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे सर्वच नेते महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडतात. आणि हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. नवाब मलिक प्रकरणावरून ठाकरे सरकार बॅकफूटवर असतानाच, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाकरे सरकारला बदनाम करण्याची सुवर्णसंधी चालून आली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने सरकारवर टीका केली जाते. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येत, महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. मात्र आता मी देखील या सरकारमध्ये सामील होण्यास तयार असल्याची ऑफर ओवेसी यांच्या खासदाराने दिली. हा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत शरद पवार यांच्याकडे पाठवला असल्याचे इतियाज जलील यांनी सांगितले. एवढेंच नाही, तर भाजपला रोखण्यात शिवसेनेमध्ये दम नसल्याचे देखील त्यांनी म्हंटले. आणि म्हणून आम्ही या सरकारशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे जलील म्हणाले.
खासदार जलील यांची ही ऑफर महाविकास आघाडी सरकारने धुडकावून लावली. मात्र यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. दानवे म्हणाले, खासदार इम्तियाज जलील देवेंद्र फडणवीसांना म्हणत आहेत, मी महाविकास आघाडी सरकारला तुमच्यात सामील होण्याचा प्रस्ताव देतो. यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब ठोकतो, आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारतो. अशी फेसबूक पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाची हवाच दानवे यांनी काढली.
ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष भारतीय जनता पार्टीची ‘बी’टीम असल्याचं आरोप सातत्याने केला जातो. एवढंच नाही, तर जाणून बुजून भारतीय जनात पार्टीला कसा फायदा होईल, अशीच भूमिका त्यांच्याकडून घेतली जाते. असाही आरोप भारतीय जनता पार्टीवर केला जातो. देवेंद्र फडणवीस आणि खासदार जलील यांचे चांगले संबंध असल्याचं देखील बोललं जातं. आणि याचाच फायदा उठवत महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला बदनाम करण्याचा कट जलील यांच्यासोबत मिळून देवेंद्र फडणवीस यांनी रचला असल्याचं, सोशल मीडियावर बोललं जात आहे.
आगामी मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, फडणवीस हा घाणेरडा प्रकार करत असल्याचं देखील बोललं जात आहे. जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला हातमिळवणीचा प्रस्ताव दिला असला तरी, हा प्रस्ताव लगेचच धुडकावून लावण्यात आला आहे. मात्र तरीदेखील देवेंद्र फडणवीस शिवसेनेला टार्गेट करतच आहेत. यावरूनच हे स्पष्ट होतं, ही ऑफर देवेंद्र फडणविस यांच्या सांगण्यावरूनच दिली गेली होती. असंही बोललं जातंय.
भारतीय जनता पार्टी कुठल्याच निवडणुकीत MIM या पक्षावर टीका करत नाही. याचे कारण म्हणजे MIM चा त्यांना अप्रत्यक्षपणे फायदा होतो. मुस्लिम मतदार हे भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक मतदार कधीच राहिले नाहीत. याऊलट हे मतदार काँग्रेसला मतदार करताना दिसून येतात. जर या मतदारांना MIM ने आपल्याकडे आकर्षित केले, तर साहजिक हे मतदार काँग्रेसला नाकरतील, आणि याचा फायदा हा भारतीय जनात पार्टीला होणार हे सरळ आहे. असं विश्लेषण अनेक राजकीय विश्लेषकांनी केले आहे.
हे देखील वाचा नवाब मलिकांचा खेळ खल्लास! मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक...
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम