आणखी चार महिने चिकनचे दर तेजीतच! ‘या’ कारणामुळे चिकनचा उडालाय भडका; वाचा सविस्तर..
गेल्या आठवड्यापासून चिकनच्या दरामध्ये विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत असल्याने, ग्राहकांनी पालेभाज्यांवर भर द्यायला सुरुवात केली आहे. तसे पाहायला गेले तर, उन्हाळ्यात चिकनचे दर हे कमी होत असतात. मात्र यावर्षी उलट चित्र पाहायला मिळत आहे. कोरोणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून, प्रत्येकजण चिकनवर अधिक भर देताना पाहायला मिळत होता. मात्र आता कोरीनाची परिस्थिती नसताना देखील, चिकनचे दर वाढल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मात्र चिकनच्या वाढण्याला दराला हवामानाबरोबरच इतरही काही महत्त्वाचेची कारणे आहेत, आज आपण त्याच संदर्भात जाणूण घेणार आहोत.
हवामानात झालेल्या बदलामुळे त्याचबरोबर कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्यामध्ये देखील वाढ झाल्यामुळे, चिकनचे सध्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. बॉयलर कोंबड्यांना जी खाद्यपदार्थ लागतात, ती खाद्य सोयाबीन आणि मक्यापासून बनवण्यात येतात. मात्र मका आणि सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. त्यामुळे कोंबड्यांना लागणारे खाद्यांचे दर देखील वाढले आहेत. आणि म्हणून, आता याचा परिणाम चिकन विक्रीवर झाला आहे. किरकोळ बाजारपेठमध्ये देखील, चिकनचे दर २३० ते २७० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
चिकनचे दर सध्या कमालीचे वाढले असले तरी, हे काही दिवसात कमी होतील असं अनेकांना वाटत आहे. मात्र होळीनंतर हे दर आणखीन वाढण्याची शक्यता अनेक तज्ञांनी वर्तवली आहे. जोपर्यंत कोंबड्यांना लागणारे खाद्य पदार्थांचे दर कमी होत नाहीत, तोपर्यंत हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी कोंबड्यांचे खाद्य 30 रुपये किलो प्रमाणे मिळत होतं, मात्र हेच खाद्यपदार्थ आता जवळपास पन्नास रुपयांच्या आसपास मिळू लागल्याने, कुक्कुटपालन व्यवसायावर देखील याचा परिणाम झाला आहे.
दोन आठवड्यापूर्वी वसई तालुक्यात काही भागात ब्लड फ्लूची लागण झाल्यानंतर, पशुसंवर्धन विभागाने ठोस पावले उचलून, हा प्रसार आणखी होऊ दिला नाही. असं असलं तरी मात्र चिकनचे दर कमी होत नसल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसांत चिकणच्या दरात आणखी भडका उडू शकतो. किरकोळ बाजारात गावरान कोंबड्यांचे दर देखील कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे आता चिकन प्रेमींना येणारे काही दिवस गप्पच बसून राहावं लागणार आहे.
या कारणांमुळे वाढले दर
कोंबड्यांची खाद्य मका आणि सोयाबीन पासून बनवली जातात. कोंबड्यांना जी खाद्य लागतात, त्यात जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक मक्याचं प्रमाण असतं. मात्र आता मका सोळा रुपयांवरून पंचवीस रुपये झाली असल्यामुळे कोंबडीचा उत्पादन खर्च वाढला आहे. फक्त मकाच नाही तर, सोयाबीनच्या किंमती देखील, गगनाला भिडल्याचं पाहायला मिळतं. सोयाबीनचे दर 35 ते 40 रुपयांवरून थेट 75 रुपये पर्यंत गेले असल्याने याचा फटका कोंबडीच्या उत्पादन खर्चला बसला आहे.
कोंबड्यांचे खाद्य पदार्थ ज्या पदार्थापासून बनवले जातात, ते दोन्हीं पदार्थ महागल्याने जे खाद्यपदार्थ 28 ते 30 रुपये मिळत होते, तेच खाद्यपदार्थ आता तब्बल 42 ते 25 रुपयांवर पोचले आहेत. कुक्कुटपालनामध्ये पोल्ट्री खाद्य ४२ वर पोहोचले आहे. सरासरी दोन किलो ग्रॅम वजनाची कोंबडी होईस्तोवर साधारण चार किलो खाद्य खात असते. त्यामुळे कुकुटपालनमध्ये उत्पादित होणाऱ्या एका कोंबडीचा खर्च हा ११० रुपयांवरून १३० रुपयांच्या वर गेल्याचं दिसतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून, चिकनच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं.
..तर दर तेजीतच राहणार
कोंबडीचे खाद्यपदार्थ मका आणि सोयाबीन या पिकांवर अवलंबून असल्याने, अनेक पोल्ट्री व्यवसायिकांच्या दृष्टीने ही दोन पिके खूप महत्त्वाची मानली जातात. मात्र या दोन्हीं पिकांचं उत्पादक सप्टेंबर महिन्यात होत असल्याने, चिकनचे दर सप्टेंबरपर्यंत तेजीतच राहणार असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. सप्टेंबरनंतर मका आणि सोयाबीन बाजार पेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते. जोपर्यंत ही दोन्हीं पिकं बाजारपेठेत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत कोंबडय़ांच्या खाद्य दरांमध्ये घट होऊ शकणार नाही. आणि जर कोंबड्याच्या दरात घट झाली नाही, तर स्वाभाविकच चिकनच्या विक्रीत देखील घट होणार नसल्याचं, तज्ञांकडून सांगण्यात येतंय.
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे देखील कोंबडीच्या मर प्रमाणात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचं पाहायला मिळतं. सर्वत्र संकट पाहून अनेक कुकूटपालन व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद केल्याचं, देखील निदर्शनास येत आहे. एकीकडे बाजारात चिकन मोठ्या किमतीने विकलं जात असलं तरी, त्याचा प्रत्यक्ष फायदा हा पोल्ट्री व्यावसायिकांना होताना दिसत नाही. त्यातच उष्णता आणि अधिक खर्च वाढला, एकीकडे उत्पादन खर्च वाढला, मात्र उत्पन्नात वाढ न होता घटच होताना दिसते. आणि म्हणून चिकनचे दर वाढले असून, येणारे काही महिने चिकनचे दर तेजीतच राहणार असल्याचं दिसतं.
हे देखील वाचा. या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर..
चित्ता आणि सिंहाची झाली कुत्र्यासारखी अवस्था; व्हायरल झालेले दोन्हीं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम