Breaking news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्कई’ यांची लष्करी कारवाईत हत्या; सोशल मीडियावर..

0

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध (Rasiya and Ukraine War) कधी संपतय याकडे संपूर्ण जग डोळे लावून बसलं आहे. कारण या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार असल्याचं, अनेक तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या अकरा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. २४ फेब्रुवारीला युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. २४ फेब्रुवारी पासून रशियाचे (Rasiya) आतापर्यंत ११ हजारांहन अधिक सैन्य मारले असल्याचा दावा यूक्रेनने (Ukraine) केला आहे. मात्र आता त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवरची आम्ही लष्करी कारवाई थांबवू. मात्र युक्रेनने आम्ही ठेवलेला मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा त्यांना याचा फार मोठा परिणाम सोसावा लागणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र युक्रेन रशियाने ठेवलेल्या मागण्या मान्य करायला तयार नसल्याचं समोर आल्याने रशिया देखील माघार घेत नसल्याचं, चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे युक्रेन रशियाचे अकरा हजारांहून अधिक सैन्य मारल्याचा दावा केला असलं तरी, आमच्या मागण्या मान्य केल्या तरच आम्ही युक्रेनवरची लष्करी कारवाई थांबवू, असं रशियाचे अध्यक्ष ‘व्लादिमिर पुतिन’ यांनी काल सांगितले होते. तर दुसरीकडे २४ तारखेपासून आतापर्यंत ११ हजारहून अधिक रशियाचे सैनिक मारले असल्याचा दावा, युक्रेनने केला आहे. मात्र, युद्धात त्यांच्या लष्करांची किती हानी झाली, याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही.

रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्की’ यांची हत्या करण्याचे आदेश दिले असल्याचे, युक्रेनच्या संरक्षण दलाने म्हटलं होतं. रशियाने आमच्या राष्ट्राध्यक्षांना ठार मारण्याचा प्लॅन आखला असून, त्यासाठी त्यांनी आपली विशेष टीम कीवमध्ये पाठवली असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता हत्या झाल्यानंतर युक्रेनची पुढील योजना काय असेल, याबद्दल अमेरिकेने खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांशी झालेल्या संभाषणात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते, मी प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाची सकाळ चांगलीच असेल, असं नाही. आणि आमची तर निश्चितच नाही. हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. कदाचित तुमच्या बरोबर हे मी शेवटचं जिवंत असेल, आणि बोलत असेल. यानंतर मी जिवंत देखील नसेल. असंही ते भावनिक होऊन म्हणाले होते. अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या झाल्यानंतर, युक्रेनने प्लॅन आखला असल्याचं, जाहीर करताच, दुर्दैवाने सोशल मीडियावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची हत्याच झाल्याची अफवा जोरदार पसरल्याचे पाहायला मिळाले. मात्र ही खोटी बातमी असल्याचं लगेच समोर आलं.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची हत्या होण्याची भीती व्यक्त करणाऱ्या ‘अँटोनी ब्लिंक’ याने एका माध्यमाशी बोलत असताना म्हटलं, “युक्रेन शासनाची लिडरशिप उत्कृष्ट आहे. आम्ही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. आमचं सरकार अस्थिर न होण्यासाठी आम्ही अनेक योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे सरकार अस्थिर करण्यासाठी अशा अफवा जाणून बुजून पसरवल्या जात आहेत. असंही त्यांनी मला सांगितलं असल्याचं अँटोनी ब्लिंक यांनी सांगितले.

हे देखील वाचा‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू

कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..

धक्कादायक! हृदयविकारामुळे नाही, ‘या’ कारणामुळे ‘शेन वॉर्न’चा झाला मृत्यू; मृत्यूच्या अगोदर बेशुद्ध अवस्थेत…

बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम..

केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर वाढतील का? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.