यामुळे दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ‘ईडी’नेच केला धक्कादायक खुलासा..
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल भल्या पहाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पकडून नेण्यात आलं. आणि आठ तास चौकशी केल्यानंतर अखेर अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नावाब मलिक सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांवर विविध आरोप करत होते. आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही सूडबुद्धीने झालेली कारवाई असल्याचे, एकीकडे राष्ट्रवादीने म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून, रस्त्यावर देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी देशद्रोह्यांसोबत आर्थिक व्यवहार केल्या असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा असा सूर विरोधकांकडून लावला जात आहे.
दरम्यान नवाब मलिक यांनी देशद्रोही लोकांसोबत आर्थिक व्यवहार केले असल्याचे आरोप का केले जात आहेत? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, ईडीने नवाब मलिक यांना चौदा दिवसांची कोठडी मागताना काही आरोप केले आहेत. त्यामध्ये त्यांनी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर यांच्यात व्यवहार होत असल्याचं म्हटलं आहे.
ईडीने न्यायालयात या संदर्भात युक्तिवाद करताना म्हटले आहे, दाऊदशी कनेक्शन असणाऱ्या एकूण सात ठिकाणच्या मालमत्तेत नवाब मलिक यांची मालकी आहे. नवाब मलिक यांनी मिळवलेली काही मालमत्ता दाऊद गॅगशी संबंधित आहे. आपल्या टोळीच्या माध्यमातून दाऊद व्यवहार करायचा. दाऊदची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल यांच्याकडून मलिक आणि त्यांच्या कुटुंबाने काही मालमत्ता खरेदी केली.
नवाब मालिक यांना विकलेल्या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान यांनी प्रमुख भूमिका बजावली. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मधील शहावली खान हा गुन्हेगार आहे. या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली असून तो जेलमध्ये आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने शहावली खानचा जबाबही नोंदवला आहे. मुनीरा यांना धमकावून नवाब मलिक व हसिना पारकर या दोघांनी मिळून त्यांच्या जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. या जागेत असणारी सॉलीड्स कंपनी नवाब मलिक यांनी खरेदी केली. या जागेत कंपनी खरेदी केल्याने, या जागेचे मलिक कुटुंबीय अधिकृत भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील ‘पॉवर ऑप अॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. असा जबाब शहावली खानने ईडीने नोंदवला आहे.
या जागेचा काही भाग नवाब मलिक यांनी तर काही जागा सलीम पटेलच्या माध्यमातून दाउदची बहीण हसीना पारकरने खरेदी केली. आणि त्यासाठी नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्या बैठक होत होत्या. असंही या जबाबात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, शहावली खानने ईडीला नोंदवलेल्या जबाबात या दोघांच्या बैठका होत होत्या तेव्हा, मी प्रत्यक्ष त्याठिकाणी उपस्थित होतो. असं म्हटलं आहे. आणि म्हणून हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका होत असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत.
हेही वाचा- कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ‘एवढ्या’ लाखांची मदत
महाविकास आघाडी सरकार बुळ आहे काय? दिग्गजांच्या संतप्त सवालानंतर पवार आक्रमक!म्हणाले..,
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम