बापरे! पुणेकरांच्या घरातच घुसला बिबट्या, केला एका तरुणावर हल्ला, या घटनेने पुणे शहर हादरले

0

काजल पाटील, पुणे प्रतिनिधी
पुण्यामध्ये बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसरमध्ये बिबट्याने मोर्निंग वॉकला गेलेल्या युवकावर हल्ला केला आहे. पहाटे हडपसर येथे ही घटना घडली आहे. हडपसर भागातील गोसाई वस्ती, सिरम कंपनीच्या पाठीमागे ही घटना घडली आहे. संभाजी आटोळे असं या तरुणाचं नाव आहे ज्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला आहे.

संभाजी आटोळे हा गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉककरिता गेला होता. तेव्हा तिथे एका बिबट्याने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात युवकाच्या पायाला आणि गालाला बिबट्याचे पंजे लागले आहेत. हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. जखमी युवक संभाजी आटोळे यांना सध्या ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. वनविभाग देखील आता बिबट्याचा शोध घेत आहे.

गेल्या काही दिवसांत इगतपुरी शहरात शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास मंगेश शिरोळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेले. मात्र कुत्र्याने बिबट्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. काही वेळानंतर कुत्रा रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी पोहोचला. कुत्र्याची अवस्था खूप खराब  झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास  सुधाकर यादव हे आपल्या शेतातील गोठ्यामधून म्हशींचे दूध काढून घरी आले होते. त्यांना त्यांच्या घराच्या अंगणात बिबट्या दिसला. बिबट्याला पाहिल्याने ते मोठमोठ्याने ओरडू लागले. तेवढ्यात त्यांनी धाडस करत आपल्या हातातील बादली बिबट्याच्या दिशेने फेकली. सुधाकरावांच्या ओरडण्याने व बादली फेकून मारल्याने बिबट्या तेथून निघून गेले आणि ते बिबट्यापासून वाचले.

दरम्यान, हडपसर येथील बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ला झालेल्या परिसरात तात्काळ पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- फरार असणाऱ्या किरण गोसावी चे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट

आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का 

आर्यन खान नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत; शाहरुख खानची दिवाळी कडू 

समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव कसं पडलं? त्याच्याच भावाने सांगितलेले कारण वाचून बसेल धक्का 

Insurance चे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्णाची सापाचा दंश देऊन ह’त्या’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.