Photo | Bussiness IAS चा अभ्यास बंद करून हा छोटा व्यवसाय केला सुरु; कमावतात कोट्यवधींचा नफा

Photo

Photo

Photo| Business: IAS ची तयारी सोडून मित्रासोबत एखादा व्यवसाय करून तो यशस्वी करून करोडो रुपये कमवणे ही गोष्ट आजच्या तरूण पिढीला प्रेरणादायी अशी आहे. आजकाल थोडे अपयश आले की खचून न जाता, कुणाचीही पर्वा न करता, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय बोलतील या गोष्टीत न अडकता या दोन तरुण मित्रांनी आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये उभे केले आहेत. तेही अगदी कमी गुंतवणूक करून. आज अशाच दोन मित्रांच्या यशाची गाथा तुम्हाला सांगणार आहे.

 

Photo
Photo                                                       देशात चहाचे चाहते असणाऱ्या लोकांची प्रचंड आहे. चहा म्हणजे चालता बोलता सहजरीत्या मिळणार पेय आणि महत्वाचे म्हणजे स्वस्त सुद्धा.  आपल्या देशात कॅाफीपेक्षा चहावर जास्त प्रेम करणारी मंडळी पाहायला मिळतात.  भारतात चहा पित नाही असे एकही घर शोधून सापडणार नाही.  सकाळी सकाळी चहा पिणे हे बऱ्याच लोकांचा दिनक्रम ठरलेला असतो.  याच गोष्टीचा फायदा घेऊन चहाच्या व्यवसाय अगदी जोमात चालू असतो. अनेक जण या क्षेत्रात व्यवसायाला सुरुवात करत आहेत.   मध्यप्रदेशच्या इंदौरमधील अनुभव दुबे या युवकाने देखील  UPSC चा अभ्यास सोडला आणि  आपल्या मित्रासोबत चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली.  आज ते आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयाचा नफा मिळवत आहेत.(Photos: Business:  started this small business by quitting IAS studies; Earns billions in profits)

आपल्या

मोफत बँक निफ्टी, निफ्टी कॉल, शेअर मार्केट बद्दल मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून तेलिग्राम चॅनल जॉईन करा. 

https://t.me/maharashtrasharemarket

अनुभव दुबे हे मूळचे मध्य प्रदेशातील एका खेडेगावाचे रहिवाशी. त्याचं ८ वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुभव यांना इंदोर येथे पाठवण्यात आले. इंदोर येथे शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांची आनंद नायक यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र झाले. कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून आनंद नायक यांनी व्यवसायाला सुरुवात केली. अनुभव दुबे यांच्या घरच्यांची अनुभव यांनी आयएएस व्हावे अशी इच्छा होती. UPSC EXAM ची तयारी करायला अनुभव यांना दिल्ली येथे पाठवण्यात आले.

UPSCचा अभ्यास बंद करून चहा विकायला सुरुवात

Photo
Photo

अनुभवने दिल्लीमध्ये जाऊन IAS ची तयारी सुरु केली होती. IAS चा अभ्यास एकदम सुरळीत चालू होता . एके दिवशी त्यांना त्यांचा मित्र आनंद नायकचा फोन आला. आपण दोघे मिळून काहीतरी व्यवसाय सुरु करुया असे मत आनंद नायक यांनी अनुभव दुबे यांच्याजवळ व्यक्त केले. आनंदने आपण चहाचा बिझनेस चालू करू, चहाला आज जगभरात पिणारे माणसं आहेत. बरेच लोक पाणी पिण्यापेक्षा चहा प्यायला पसंद करतात. अगदी छोट्या मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत चहाचा चाहता वर्ग आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवसाय करायला भांडवल महत्वाचे असते. मात्र या व्यवसायात कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय उभा करता येईल. असे मत अनुभव यांच्याजवळ व्यक्त केले.

Photo
Photo

दोघांनी चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. इंदौरमध्ये त्यांनी दुकान चालू केले. दोघांनी मिळून सुरुवातीला तीन लाख रुपये भांडवल गुंतवले. त्यांनी आपल्या दुकानाला ‘चायसुट्टा बार’ हे नाव दिले. अनुभव व आनंद यांचे काही लोकांनी अभिनंदन केले काही लोकांनी कुचेष्टा देखील केली. परंतु ह्या दोघांनी ह्या गोष्टीचा परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही आणि व्यवसायात देखील घवघवीत यश मिळवले.

अनुभव आणि आनंद या दोघांनी मिळून तीन लाखांची गुंतवणूक करुन इंदौरमध्ये पहिले ‘चायसुट्टा बार’ या नावाने दुकान उघडले. हे दुकान उघडल्यानंतर काही जणांनी त्याचे कौतुक केले तर काही जणांनी त्यांना नावं ठेवली. पण त्यांनी न डगमगता आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखवला.

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/Bp1pR0nrt4rAjrZfCwajr9

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.