सोमेश्वरनगर ता. बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये कोरोना ची लाट पसरल्यामुळे रक्ताचा तुटवडा नेहमीच जाणवत आहे. काही सामाजिक संघटना व राजकीय पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, आजी माजी सैनिक संघटणा बारामती, समस्त ग्रामस्थ सोमेश्वरनगर पंचक्रोशी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना पाण्याचा जार हा भेट स्वरूपात मिळणार आहे.

रविवार दि: २०/१२/२०२० रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी पाच पर्यंत हे शिबिर चालू असणार आहे. सोमेश्वर(करंजेपूल) येथील कैलासवासी बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुल या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या रक्तदान शिबिर करण्यासाठी रक्तदाते पुढे येत नाहीत. वेगवेगळे गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. रक्तदान केल्यामुळे लोकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. या उद्भवलेल्या परिस्थितीवर सर्वजण मिळून मात करूया. आज आपला सैनिक सीमेवरती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहे. आपण देखील रक्तदान करून आपले कर्तव्य बजावावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकशाही न्युज व्हॉटसअप ग्रुपसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

://chat.whatsapp.com/CnVoyBhi9I0HqM1V6J5tpd

काही अडचण व रक्तदान नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क करा:
अमोल भोसले:9850041312
अभिजित जगताप: 8806679251
अनिल शिंदे: 7350045161
सागर गाडेकर: 9766418758
अमित चव्हाण: 9860435173
शुभम खलाटे : 9975487952
अक्षय कदम : 9021808003
प्रसाद तावरे : 8796966675

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.

WhatsApp Group