Gopichand padalkar: चाटूगिरी करून समाजाचा प्रश्न सुटत नाही,शेठ वास्तवात या; डॉ सुदर्शन घेरडे..
Gopichand padalkar: समता परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे (sudarshsn gherade) यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्यावर भाष्य करत सोशल मीडियावरील (social media) नेत्यांच्या स्तुतीपेक्षा जनतेच्या भावना आणि प्रश्न समजून घेण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांना केले आहे.
डॉ. घेरडे म्हणाले, समाजातील प्रश्न केवळ सोशल मीडियावरील कौतुक किंवा स्तुतीमुळे सुटत नाहीत. जनतेच्या प्रतिक्रिया आणि नाराजीची कारणे समजून घेतली पाहिजेत. तसेच केवळ व्यक्ती किंवा नावांभोवती राजकारण करण्याऐवजी प्रत्यक्ष प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
धनगर समाजाला २०१४ पासून आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले, मोठ्या निधीच्या घोषणा झाल्या; मात्र आजही सामान्य धनगर युवक नोकरी, शिक्षण आणि आरक्षणासाठी संघर्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला. या घोषणांचे पुढे काय झाले, जाहीर केलेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. घेरडे यांच्या या वक्तव्यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्यांनी शासनाकडून आश्वासनांची अंमलबजावणी आणि पारदर्शकतेची अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉ. सुदर्शन घेरडे हे समता परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. ते एक उच्चशिक्षित असून काँग्रेसचे नेते आहेत. ओबीसी समाजाच्या हक्क आणि मागण्यांसाठी काम करणारे ते एक धडाडीचे नेते आहेत.ते आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम